उत्पादन खर्चात वाढ; मात्र उत्पन्नात होणार घट

उत्पादन खर्चात वाढ; मात्र उत्पन्नात होणार घट

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirwade Vani

परिसरात मका पिकावर (Maize Crop) लष्करी अळीचा प्रादूर्भाव वाढल्याने हातात आलेले पीक वाया जाण्याचा धोका वाढला आहे.

महागडी औषधे, कीटकनाशके (Pesticides) फवारूनही अळी नियंत्रणावर यश येत नसल्याने पीक उत्पादनात घट होऊन शेतकर्‍यापुढे आर्थिक टंचाईचे (Financial scarcity) संकट उभे ठाकले आहे.

गेल्या दोन-तीन वर्षापासून मका पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने मका उत्पादनात सातत्याने घट होत आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांचे जीवनमान शेतीवरच अवलंबून असते.

मात्र आता भरवशाच्या असलेल्या मका पिकाला लष्करी अळीचा वेढा पडल्याने या पिकावर झालेला खर्च फिटणे अवघड झाले आहे. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी (farmers) आता सोयाबीन (Soybean) पेरणीला पसंती देवू लागले आहे. यावर्षी सोयाबीनला प्रति क्विंटल 8 हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला होता. त्यामुळे यावर्षी परिसरात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले आहे.

पावसाच्या भरोशावर मका व सोयाबीनचे पिक अवलंबून असल्यामुळे यंदा समाधानकारक पाऊस होत असून तो पिकांना लाभदायक ठरत आहे. सोयाबीन पिकाचे भाव वाढत असले तरी मका लागवडीमुळे मात्र शेतकर्‍यांना दुहेरी फायदा होत आहे. म्हणजे उत्पादनाबरोबरच जनावरांना चारा उपलब्ध होत असल्याने अनेक शेतकरी (farmers) मका लागवडीला प्राधान्य देत आहे. परंतु यावर्षी अतिपावसामुळे (heavy rain) शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले असून उत्पादनात कमालीची घट होणार आहे.

त्यातच गेल्या काही वर्षापासून अतिवृष्टी (heavy rain), नैसर्गिक आपत्ती (natural disaster), बनावट खते, औषधे, पाणीटंचाई (water shortage), मजुरांचा तुटवडा यासारख्या समस्यांचा शेतकर्‍यांना सामना करावा लागत आहे. असे असतांनाही बाजारभावाची देखील हमी नसल्यामुळे शेतीव्यवसाय आता तोट्याकडे वाटचाल करतांना दिसत आहे. त्यातच आता मका पिकाला लष्करी अळीचा सामना करावा लागत आहे. तर द्राक्षबागेत पाणी साचल्याने उत्पादन घटणार आहे.

भाजीपाला वर्गीय पिकांमध्येही पावसाचे पाणी साचल्याने ही पीके सडू लागली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून पीके वाचवावी कशी असा अवघड प्रश्न शिरवाडे वणी परिसरातील शेतकर्‍यांना सतावत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com