भाजीपाला आवकेसह दरात वाढ
नाशिक

भाजीपाला आवकेसह दरात वाढ

भाजीपाल्याची १२४ वाहने रवाना

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दोन आठवड्यात विविध भागात कमी अधिक पाऊस झाला असून यात कमी प्रमाणात झालेल्या भागात पाऊस भाजीपाल्याला पोषक ठरत आहे. परिणामी भाजीपाल्याची आवक वाढत असतांना भावात चांगली सुधारणा झाल्याचे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे.

सोमवारी (दि.10) नाशिक बाजार समितीत 13 हजार 417 क्विंटलच्यावर भाजीपाल्याची आवक झाली.तसेच मुंबई उपनगर, राज्यात व परराज्यात 124 भाजीपाल्याची वाहने रवाना झाली. दरम्यान ढोबळी मिरची, वांगी, टमाटे व हिरवी मिरचीला चांगला भाव मिळाला.

जुलै महिन्यात नाशिक मार्केट कमेटीतील भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांना चांगला भाव मिळाला होता. नंतर जिल्ह्यात बहुतांशी भागात मागील काही दिवसात पाऊस पडल्याने आता भाजीपाल्याला जीवदान मिळाले आहे.

यात कमी पाऊस झालेल्या भागातून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. सेमवारी मार्केट कमेटीत व नाशिकरोड येथील मार्केटच्या उपबाजारात भाजीपाला आवक वाढली. परिणामी मुंबइ व इतर राज्यात जाणार्‍या भाजीपाल्यात देखील वाढ झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com