फार्मसीच्या नोंदणीत वाढ!

फार्मसीच्या नोंदणीत वाढ!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

फार्मसी, एमबीए, अभियांत्रिकी, एमसीए आणि इतर अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी सीईटी सेलने दिलेली मुदत अखेर संपली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अभियांत्रिकी, फार्मसी, सर्वच अभ्यासक्रमांना नोंदणी करणार्‍या विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवेश निश्चितीसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकीसाठी यंदा 1 लाख 18 हजार 390 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी 87 हजार 250 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमसीएसाठी नोंदणी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 12 हजार 258 तर एमबीएसाठी अर्ज करणारी विद्यार्थ्यांची संख्या 55 हजार 181 इतकी आहे.

त्यामुळे यंदा प्रवेशासाठीची स्पर्धा चुरशीची होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. व्यवस्थापन क्षेत्रासाठी झालेल्या नोंदणीची संख्याही यंदा उत्तम आहे. अभियांत्रिकीच्या राज्यात 14 हजार जागा कमी झाल्या आहेत, तर फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने याच्या जागा वाढल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com