
लासलगाव। वार्ताहर Lasalgaon
येथील बाजार समितीमध्ये Lasalgaon APMC उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये Onion Rate क्विंटलमागे एका दिवसात दोनशे 30 रुपये वाढ होऊन उन्हाळ कांद्याला कमाल 2130 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
शेतकर्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेला होता बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या वजनात आणि प्रतवारी मध्ये कमालीची घट झाल्याने वाढलेल्या भावाचा फायदा शेतकर्यांना होताना दिसत नाही
गेल्या काही दिवसांपासून संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होणार असल्यामुळे तसेच नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकर्यांनी चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब झाला आहे.
मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मंगळवारच्या तुलनेत आज 230 रुपयांची वाढ झाली.29 जुलै रोजी उन्हाळ कांद्याला 2020 रुपये भाव मिळाला होता त्यानंतर कांद्याच्या बाजार भावात सातत्याने घसरण झाली होती.
मात्र पावणेदोन महिन्यानंतर पुन्हा उन्हाळ कांदा लासलगाव बाजर समितीत दोन हजारी पार केली आहे.बाजार समितीत 911 वाहनातून 14 हजार 76 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली कमाल 2120 रुपये ,किमान 800 रुपये तर सर्वसाधारण 1980 रुपये इतका प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला.