करोना अपडेट
करोना अपडेट

मनपाकडून करोना बाधीतांसाठी खाटांच्या संख्येत वाढ

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात करोनाचा प्रकोप सुरूच असून गुरुवारी उच्चांकी करोना बाधीत समोर आल्यानंतर अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा 21 हजारावर जाऊन पोहचला आहे. यामुळे मनपा प्रशासनाची चिंता वाढली असून तातडीने खाटा वाढविण्यात येत आहेत. सर्वसाधारण खाटात 128, ऑक्सिजनच्या 23 खाटा व कोविड रुग्णालयातील 85 खाटा वाढविण्यात आल्या आहे. तसेच कोविड केअर सेंटरच्या उभारणीला वेग देण्यात आला असून याठिकाणी आता ऑक्सीजन खाटांची उपाय योजनांसाठी अधिकार्‍यांची धावपळ सुरु झाली आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात एप्रिलच्या आठव्या दिवशी सलग सातव्या दिवशी प्रतिदिन सरासरी अडीच हजार ते तीन हजार नवीन रुग्ण समोर येत आहे. ज्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे, तसा मनपाच्या वैद्यकिय आरोग्य विभागावर ताण पडत आहे. अ‍ॅक्टीव्ंह रुग्ण वाढत असल्याने शहरात रुग्णांना खाटांचा तुटवडा भासत असल्याने आता नवीन खाटा उपलब्ध करुन देण्याचे काम युध्द पातळीवर सुरू झाले आहे. खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी कायम असुन गंभीर रुग्णांना रेमडीसीवीर मिळत नसल्याने नातेवाईकांची हेळसांड सुरू झाली आहे. बेड मिळत नसल्याने आता राजकिय मंडळीच्या विनवण्या केल्या जात असुन ऑक्सीजन व रेमडीसीवीर इजेक्शन मिळत नसल्याने गंभीर रुग्णांचा मृत्यु होत असल्याचे वास्तव समारे येत आहे.

गुरुवार(दि.8)पर्यत शहरातील रुग्णांचा आकडा 1 लाख 35 हजार 1450 इतका झाला असून 1 हजार 225 जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच महापालिका क्षेत्रात उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांचा आकडा 21 हजार 357 पर्यत जाऊन पोहचला आहे. यातील 70 ते 80 टक्क्याच्यावर रुग्ण घरी उपचार घेत असुन त्यांची मनपाकडुन आरोग्य तपासणी व्यवस्था केली जात आहे.

अ‍ॅटीजेन चाचण्याची केंद्र वाढली

शहरात महापालिकेकडुन 10 केंद्रातून अँटीजेन चाचणी केली जात असुन याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता आता नवीन 10 ठिकाणी अशाप्रकारे एकुण 20 केंद्रावर आता चाचणी केली जात आहे. दररोज महापालिका प्रशासनाकडुन सुमारे 3 ते 4़ हजार अँटीजेन चाचण्या केल्या जात असल्याने आता संसंर्ग रोकण्यासाठी हातभार लागला जात आहे.

केंद्रीय पथकाकडुन रुग्णालय - प्रतिबंध क्षेत्रात पाहणी

शहरात केंद्र शासनाकडुन आलेल्या पथकाने डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, यासह शहरातील काही प्रतिबंध क्षेत्रात जाऊन पाहणी केली. याठिकाणी रुग्णांची, येथील डॉक्टर यांच्याकडुन काही माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com