साथीच्या आजारांत वाढ; राज्य शासनाचा सतर्कतेचा इशारा

साथीच्या आजारांत वाढ; राज्य शासनाचा सतर्कतेचा इशारा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) ठिकठिकाणी साथीचे रोग (Epidemic diseases) वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

यातून दक्षिण भारतासह देशातील अनेक शहरांमध्ये कोविड (corona) रुग्ण आढळत असल्याने राज्य शासनाच्या (State Govt) आरोग्य विभागाने (Department of Health) सर्व महापालिका नगरपालिकांना सावधानतेचे आदेश दिले आहेत. अवकाळी पावसामुळे बदललेल्या वातावरणात सर्दी (cold), खोकला (Cough), ताप (fever) यांचे रुग्णसंख्या वाढत आहे. H-3 N-2 रुग्णांची देखील नोंद दिसून येत आहे.

ठिकठिकाणी त्यामुळे वैद्यकीय उपचार केले जात असले तरी नागरिकांनीही आजार जास्त दिवस राहणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने (Department of Health) देशभरात रुग्णसंख्या वाढताना दिसू लागल्यामुळे राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

नाशिक शहरात त्यादृष्टीने तपासणीही वाढवण्यात आले असून, सुमारे 500 रुग्णांच्या H-3 N-2 तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी आजार अंगावर काढू नये जवळच्या रुग्णालयातून वैद्यकीय उपचार तातडीने घ्यावे आपल्या तपासण्या वेळेवर करून घ्याव्या व सतत सतर्कता बाळगत सुरक्षित रहावे, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com