प्राथमिक शाळांच्या दिवाळी सुटीत वाढ

सर्वेक्षण चाचणी असणार्‍या शाळांना विशेष सुटी
प्राथमिक शाळांच्या दिवाळी सुटीत वाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

माध्यमिक शिक्षण विभागाच्या Department of Secondary Education पाठोपाठ आता महापालिका, सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक शाळांना primary schools 14 नोव्हेंबरपर्यंत सुट्टया वाढवून Diwali Holidays देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता 15 नोव्हेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू होतील. परंतु असे असताना ज्या शाळांमध्ये 12 नोव्हेंबरला सर्वेक्षण (नास) चाचणी आयोजित केली आहे त्या शाळा सुरू राहणार आहेत. त्या शाळांना दि.15-16 नोव्हेंबरला विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरलाच खर्‍या अर्थाने शाळा नियमित सुरू होतील. याबाबतची माहिती मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर Sunita Dhangar, Administrative Officer, Municipal Education Departmentयांनी दिली.

दरम्यान शासन परिपत्रकानुसार 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंरपर्यंत पर्यंत दिवाळी सुट्यांच नियोजन करण्यात आले होते. परंतू दिवाळीसुटीनंतर 11 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा उघडणार असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व्ही. एम. कदम यांनी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन मंगळवारी (दि. 9) पुन्हा नवीन परिपत्रक काढून दिवाळी सुटीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांना आता 10 नोव्हेंबरऐवजी 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुटी असेल.

21 नोव्हेंबरला रविवार असल्याने शाळा आता 22 नोव्हेंबरला उघडतील. यासगळ्या प्रकारामुळे माध्यमिक विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाशी समन्वय न ठेवता परस्पर निर्णय घेतल्याने प्राथमिक विभागातील शिक्षकांकडूनही दिवाळी सुटीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्याच बरोबरीने कमी झालेल्या सुट्टयांबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याबाबत प्राथमिक विभागाच्या संचालकांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिवाळी सुट्टयामध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. परंतु या सगळ्या प्रकारात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यात असलेला असमन्वय पुन्हा एकदा दिसून आला. शिक्षण विभागातील वेगवेगळ्या निर्णयांमुळे शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम व गोंधळ निर्माण झाला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com