कसबे सुकेणेत डेंग्यूच्या रुग्णात वाढ

कसबे सुकेणेत डेंग्यूच्या रुग्णात वाढ

कसबे सुकेणे । Kasbe Sukene

कसबे सुकेणे (Kasbe Sukene) व परिसरात करोना (Corona) रुग्णांची संख्या मर्यादित असली तरी करोना बरोबरच आता कसबे सुकेणे व मौजे सुकेणे परिसरात डेंग्यू (Dengue) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह (Primary Health Center) खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत प्रशासनाकडून केले जात आहे.

मध्यंतरी मौजे सुकेणे ग्रामपालिकेकडून गावातील सर्व रस्ते, परिसरात असलेले गाजर गवत व इतर गवतावर तणनाशक फवारणी व परिसराची स्वच्छता करण्यावर भर दिला. ग्रामपालिकेकडून एक दिवसाआड घरगुती कचर्‍याचे संकलन केले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपालिका मौजे सुकेणे, कसबे सुकेणे माध्यमातून डेंग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संभाव्य जागेची पाहणी करून उपाययोजना केली जात आहे.

तरीदेखील पावसाळ्याचे दिवस असल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळल्यास संबंधितांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव पाटील यांचेसह प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com