किसान पार्सल रेल्वेच्या फेर्‍यांत मागणीनुसार वाढ

किसान पार्सल रेल्वेच्या फेर्‍यांत मागणीनुसार वाढ
किसान पार्सल रेल्वेच्या फेर्‍यांत मागणीनुसार वाढ

नाशिकरोड । Nashikroad (प्रतिनिधी)

शेतकर्‍यांसाठी किसान देवळाली ते दानापूर दरम्यान किसान रेल्वे 7 आगस्टपासून सुरु झाली आहे. भारतातील ही पहिली किसान पार्सल गाड़ी आहे. आठवड्यातून एकदा ती धावत असली तरी शेतकर्‍यांनी मागणी केल्यास या गाड़ीच्या फेरीमध्ये वाढ केली जाईल, असे रेल्वेने कळविले आहे.

शेतकर्‍यांना माल पॅक करून जवळ रेल्वे पार्सल ऑफिसमध्ये आधार कार्डच्या झेरॉक्ससह आणावा लागेल. देवळालीहून ही गाडी शुक्रवारी 11 वाजता, नाशिकरोडला 11.30, मनमाडहून 12.55, जळगावहून 15.15, तर भुसावळहून 16.05 वाजता सुटेल.

यापूर्वी रेल्वेने केळी आणि इतर एकल पदार्थांच्या निर्यातीसाठी विशेष रेल्वे चालवली आहे. मात्र, किसाने रेल्वे डाळिंब, केळी, द्राक्षे या फळांसह शिमला मिरची, फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, पत्ताकोबी, कांदे, मिरच्या आदी भाज्यांची वाहतूक करणार आहे.

स्थानिक शेतकरी, मजूर, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर व्यक्तींच्या सहाय्याने विपणन करण्यात येणार आहे. मागणीची एकत्रित नोंद केली जाईल.

प्रमुख स्थानकाचे शुल्क (प्रति टन भाडे)

1) नाशिकरोड-देवळाली ते दानापूर- 4001 रुपये.

2) मनमाड ते दानापूर-3849 रुपये.

3) जळगाव ते दानापूर-3513 रुपये.

4) भुसावळ ते दानापूर-3459 रुपये.

5) खांडवा ते दानापूर-3148 रुपये.

शेतकर्‍यांकडून ‘पी’ श्रेणी अंतर्गत नियमित पार्सल भाडे आकारण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com