
देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devali Camp
दिवसेंदिवस थंडीचा (cold) जोर वाढत असल्याने ताज्या भाजीपाल्यासह फळांना मागणी वाढली असल्याचे चित्र बाजारात (Market) दिसून येत आहे...
थंडीच्या दिवसात पोषक व आरोग्यवर्धक आहार म्हणून पपई, द्राक्ष, सफरचंद, चिकू, केळी, मोसंबी, पेरू आदी रसदार फळांना सकाळच्या आहारात स्थान दिले जाते. त्यामुळे सध्या बाजारपेठेत विविध भागांतून येणार्या फळांना (Fruits) मोठी मागणी आहे. करोनाकाळात भाजीपाल्यासह फळांचे महत्व वाढले होते. ते अद्यापही टिकून आहे.
तसेच नाशिक हा द्राक्ष उत्पादकांचा (Grape Growers) जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्थानिक बाजारपेठेतही येथील द्राक्षांची निर्यात केली जाते. दारणा पट्ट्यात काळ्या द्राक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे.
त्याचबरोबर देवळाली कॅम्प, नाशिकरोड, सिन्नरफाटा, भगूर येथील बाजारपेठेत रसदार फळांना मोठी मागणी आहे. सध्या थंडीचा जोर वाढलेला असून सुदृढ आरोग्यासाठी फळांना चांगली मागणी असल्याने विक्रेते (Sellers) समाधानी आहेत.
यंदा पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने सध्याचे हवामानही फळे व भाज्यांसाठी लाभदायी असल्यामुळे दर्जेदार माल बाजारपेठेत दाखल होत आहे. ग्राहकही फळांकडे आकर्षित होत असून चांगले उत्पन्न मिळत आहे. रसदार देशी फळांना कायम मागणी असल्याने समाधानकारक विक्री होत आहे.
अजीज सय्यद, फळविक्रेता