करोना सावटातही चिकनला अच्छे दिन

ऐन उन्हाळ्यातही अंड्यांच्या भावात तेजी
करोना सावटातही चिकनला अच्छे दिन
USER

येवला । Yeola

गेल्या वर्षी सर्वत्र लॉकडाऊनच्या काळात पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी पोल्ट्री व्यावसायिकांना करोना सावटातही अच्छे दिन आले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात चिकन व अंड्यांचे कमी होणारे दर क रोना काळात वाढत असून मागणीतही विक्रमी वाढ होताना दिसत आहे.

यावर्षी करोनाने मोठा उच्छाद मांडला असून, ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन सुरू आहे. ग गत वर्षाच्या लॉकडाऊन काळात करोनाची लागण बॉयलर चिकन पासून होत असल्याच्या अफवेमुळे लोकांनी चिकन व अंडी खाण्याकडे पाठ फिरविली होती. अंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात घसरल्याने काही ठिकाणी अंडी नष्ट करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली होती. चिकन व अंडी खाण्याकडे लोकांनी पाठ फिरवल्याने चिकन चक्क 20 ते 30 रुपये किलो, तर अंड्याचे दर शेकड्याला 200 ते 250 रुपये इतके घसरले होते. कुकुटपालन व्यवसाय अनंत अडचणीत मार्गक्रमण करत होता. कुक्कुटपालन कंपन्या माल उचलत नसल्याने व्यावसायिक कर्जबाजारी झाले होते. यावर्षी मात्र कुक्कुटपालन व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले असून, एप्रिल महिन्याच्या सप्ताहात बॉयलर चिकनचे दर 200 ते 240 रुपये प्रति किलोवर पोहचले होते. तर अंडी 500 ते 550 रु शेकडा दरात या भावात मिळत होते. चिकन व अंड्यांच्या दरात वाढ होऊन ही मागणी मात्र वाढतच आहे. करोनाची लागण झालेल्या रुग्णास अंडी व चिकन खाण्याच्या वैद्यकीय सल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात खप वाढला असून, मागणीत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. लॉकडाऊन काळात देखील अंडी व चिकन विक्री दुकाने आवश्यक सेवेत सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने रुग्णांसह सर्व सामान्य जनतेने आरोग्याच्या दृष्टीने अंडी व चिकन खाण्यास पसंती दर्शविली आहे. उन्हाळ्यात कुकुटपालन क्षेत्रात अंडी व कोंबड्यांचे वजन वाढीचे प्रमाण कमी होत असते.करोनामुळे मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी होत असल्याचे मत व्यापारी वर्गातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. कडक उन्हाळ्यात देखील तुलनात्मक कमी होणारे बॉयलर चिकन व अंडीचे दर वाढते असून ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बॉयलर दर- 90 ते 110 प्रतिकिलो, चिकन विक्री- 210 ते 250 प्रतिकिलो किरकोळ, अंडी प्रतिशेकडा -500 ते 550 ठोक, अंडी प्रतिशेकडा- 650 ते 700 किरकोळ.

तीन पिढ्यांपासून आमचे कुटुंब बॉयलर अंडी विक्रीचा व्यवसाय करत आहोत. येवला शहरासह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये अंडी पुरवीत असतो गतवर्षी 2 ते 2.50 रुपयाला मिळणारे अंडे आज 5 ते 6 रुपये दराने विकले जात असून मागणीतही सातत्याने वाढ होत आहे

आय.ए.पठाण,बॉयलर अंडी व्यावसायिक,येवला

दरवर्षी उन्हाळ्यात चिकनचा दर सरासरी 50 ते 60 रु प्रति किलो असतो. मागच्या वर्षी लॉकडाऊन काळात विविध अफवांमुळे हा दर 12 ते 20 रु प्रतिकिलो उतरला होता यावर्षी जिवंत कोंबडीचा दर 96 ते 130 रुपये प्रति किलो असून मागणीही वाढतच आहे.

राजेंद्र शेलार पोल्ट्री व्यावसायिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com