दापूर ते भोजापूर रस्तावर अपघातात वाढ

दापूर ते भोजापूर रस्तावर अपघातात वाढ

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील दापूर ते भोजापूर (Dapur to Bhojapur) रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघाताचे (accident) प्रमाण वाढत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिन्नर-अकोले रस्त्यावर (Sinnar-Akole Road) असलेले दापूर व चापडगाव या दोन गावांदरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे (potholes) पडले आहेत. या खड्यांतून वाहन चालवणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे होत आहे. अकोले रस्त्यावरुन जाताना गोंदे गावापर्यंतचा रस्ता चांगला आहे. मात्र, पुढे दापूरपासून ते सिन्नर तालुक्याच्या (sinnar taluka) हद्दीपर्यंतचा पुर्ण रस्ता उखडून गेल्याचे चित्र आहे.

यंदा या परिसरात पाऊसही कमीच प्रमाणात झाला असली तरी या रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे वाहनधारक मनस्थाप व्यक्त करत आहे. या रस्त्यावरुन दुचाकी चालवणे तर जिवशी खेळण्यासारखे झाले असून अनेक दुचाकीधारकांचे या खड्ड्यामुळे अपघात झाल्याचे बघायला मिळत आहे.

परिसरातील शेतकरी (farmer) व नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करुनही कुठल्याही लोकप्रतिनिधिंकडून याकडे लक्ष दिले जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागानेही (Public Works Department) याकडे लक्ष देऊन तात्काळ रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी वाहनधारक व शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

महत्वाचा रस्ता

सिन्नर व अकोले या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता असली तरी रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर गोंदे, दापुर, चापडगाव, भोजापूर हे महत्वाचे गावे आहेत. तर अकोले तालुक्यातूनही अनेकजण दररोज सिन्नरला कामानिमित्त येत असतात. परिसरात बागायती क्षेत्र असल्याने शेतकर्‍यांचे शेतमाल मार्केटला आणण्यासाठी रस्त्याचा मोठा वापर होत असतो. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहने चालवणेच मुश्किल होत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

समृद्धीमुळे रस्त्याची वाट

या परिसरातून समृद्धी महामार्ग जात असल्याने महामार्गाच्या कामासाठी लागणारे गौण खणिजासाठी भोजापूर, चापडगाव व दापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले. समृद्धीचे 20 ते 25 अवजड वाहने दररोज याठिकाणाहून गौण खणिजे वाहून नेत होते. दिवसाला एक वाहनाच्या 10 ते 15 वेळेस या रस्त्याने ये-जा झाल्याने रस्त्याची पुर्ती वाट लागली. त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेस समृद्धीचे अवजड वाहने कारणीभूत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

खड्यांमुळे अपघात

मला दररोज या रस्त्याने कारखान्यात कामासाठी ये-जा करावी लागते. रात्रीचे काम सुटल्यानंतर रस्त्याने ये-जा करतांना एक दिवस चापडगाव परिसरातील एका खड्यात दुचाकी घसरल्याने पायाला मोठी ईजा झाली. त्यामुळे अनेक दिवस कामावर येता आले नाही. रोजही बुडाला व पायालाही जखम झाली. संबधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com