गतिरोधकांमुळे अपघातात वाढ

राज्यमार्ग क्रमांक 23 वर तास दिंडोरीत अडथळा
गतिरोधकांमुळे अपघातात वाढ

निफाड। प्रतिनिधी | Niphad

सुरत (surat), वघई (Waghai), वणी (vani), पिंपळगाव (pimpalgaon), निफाड (niphad), नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar), सिन्नर (sinnar), घोटी (ghoti) या राज्य क्रं.23 वरील तास दिंडोरी (dindori) गावाजवळ तब्बल पाच गतिरोधक टाकण्यात आले असून या गतिरोधकांमुळे अपघातांचे (accidents) प्रमाण वाढले आहे.

राज्यातील सर्वच महामार्गासह प्रमुख रस्त्यावरील गतिरोधक शासनाच्या आदेशाने हटविण्यात आले असतांनाच व नविन गतिरोधक (speed breaker) करण्यात येवू नये असे शासनाचे आदेश असतांनाही या रस्त्यावरील प्रमुख शहराजवळ गतिरोधक नसतांना एका खेडेगावात तब्बल पाच ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आल्याने या गतिरोधकाविरोधात वाहन चालक व प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) हे गतिरोधक हटवावे अशी मागणी होवू लागली आहे.

राज्य, राष्ट्रीय तसेच जिल्हा, राज्य मार्गावर राज्यात कुठेही गतिरोधक नाही. अगदी मोठी शहरे, दवाखाने, शाळा, चौक व अतिरहदारीच्या ठिकाणचे देखील गतिरोधक शासन निर्णयानुसार हटविण्यात आले आहेत. कारण हेच गतिरोधक अपघाताला कारण ठरले आहेत. मात्र राज्यभरातील कुठल्याही रस्त्यावर गतिरोधक नसतांना राज्य क्रं.23 वरील रस्त्याचे रूंदीकरण (Road widening) व डांबरीकरण (Asphalting) काम पूर्ण होताच व हे काम करतांना फक्त दिंडोरी (dindori) गावाजवळ पाच गतिरोधक बसविण्यात आले आहे.

त्यामुळे हे गतिरोधक बसविण्यासाठी कुणाचे वजन भारी पडले. गतिरोधक बसविल्यापासून याच परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांसह शेतमाल वाहतूक करणारी वाहने, चारचाकी व दुचाकीस्वारांचा अपघात होवून अनेकांना अपंगत्व आले आहे. तर अनेक वाहने नादुरूस्त झाले आहे. असे असतांनाही अद्यापपर्यंत या परिसरातील गतिरोधके काढण्यात आलेली नाही.

याच रस्त्यावर वणी, पिंपळगाव, निफाड, शिवरे फाटा, नांदूरमध्यमेश्वर, म्हाळसाकोरे, सिन्नर, पांढुर्ली, घोटी अशा कुठल्याही ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले नाही. मग तास दिंडोरी या छोट्याशा गावात एकदम पाच गतिरोधक बसविण्यासाठी प्रशासनावर कुणाचा दबाव होता. तसेच शासकीय आदेश पायदळी तुडवत संबंधित बांधकाम विभागाने व संबंधित ठेकेदाराने कुणाचे आदेशाने हे गतिरोधक बसविले.

तसेच रस्ता बनवितांना तो अनेक ठिकाणी कमी-अधिक रूंदीचा बनविला आहे. त्यामुळे या संपूर्ण रस्ता कामाची चौकशी होवून यात दोषी असणारे संबंधित ठेकेदार, कर्मचारी, अधिकारी यांचेवर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील वाहनचालक, प्रवाशी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेकडून होऊ लागली आहे.

गतिरोधक की अपघाताचा सापळा सुरत-सिन्नर-घोटी या महामार्गावर कोठेही गतिरोधक नसतांना एकट्या तास दिंडोरी गावाजवळ 5 गतिरोधक कशासाठी व कुणाच्या मर्जीने बसविले आहे. या गतिरोधकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिकांना अपंगत्व आले आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार. त्यामुळे हे गतिरोधक तत्काळ काढण्यात यावे. अन्यथा यापुढे या गतिरोधकावर होणार्‍या अपघातांची जबाबदारी संबंधित विभागावर टाकावी. तसेच दिंडोरी गावाजवळील कालवा लगत असणारे रस्त्याचे अपघाती वळण तत्काळ काढून या ठिकाणी सरळ रस्ता व्हावा यासाठी डावा कालवा व जलद कालव्यावर नव्याने समांतर पूल बांधून हे वळण नाहिसे करावे.

दिलीप कराड, पोलीस पाटील (शिवरे)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com