'या' भागात सिटीलिंकच्या बसफेऱ्या वाढवा; मनसेची मागणी

'या' भागात सिटीलिंकच्या बसफेऱ्या वाढवा; मनसेची मागणी

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) नाशिक शहर व लगतच्या भागांतील जनतेच्या आवागमनाच्या सोयीसाठी सिटीलिंक (Citylink) बस सेवा (bus service) सुरु केली आहे व त्यास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

नवीन नाशिक (navin nashik) येथील विजय नगर परिसरात पूर्वी सुरु असलेल्या एसटी महामंडळाच्या (ST Corporation) वेळापत्रकानुसार बस फेऱ्या बंद झाल्याने परिसरातील नागरिक, व्यावसायिक, कामगार, महिला व विद्यार्थी वर्गाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

नवीन नाशिक, विजय नगर ते शहरातील विविध भागांत नियमित सिटीलिंक (Citylink) बस फेऱ्या सुरु करून परीसरातील जनतेला दिलासा द्यावा असे निवेदन (memorandum) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Sena) सिटीलिंक व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.

या प्रसंगी मनसे शहर संघटक अर्जुन वेताळ, शहर चिटणीस संदिप दोंदे, महाराष्ट्र सैनिक देवचंद केदारे, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे व विजय आगळे, विभाग अध्यक्ष नितीन माळी, सु.र.से. चिटणीस कैलास मोरे, मनसैनिक संदिप बोरसे, अनिकेत निकम, शंकर कनकुसे व संदिप मालोकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com