ग्रामस्थांची गैरसोय; पुरातून धोकादायक प्रवास

ग्रामस्थांची गैरसोय; पुरातून धोकादायक प्रवास

ननाशी । विनोद गायकवाड | Nanashi

यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही दिंडोरी तालुक्याच्या (dindori taluka) पश्चिम भागातील जोरण (joran) येथील शालेय विद्यार्थ्यांना (students) मात्र शाळेत जाण्यासाठी नदीतील पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

दिंडोरी तालुक्यातील जोरण या गावात बहुतांशी लोकवस्ती शेतकरी (farmers) कुटुंबांची आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक शेतातच वस्ती करून राहतात. मळ्यामध्ये वस्ती करून राहत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात (monsoon) शाळेत जाण्यासाठी मात्र जीवघेणी कसरत करावी लागत आहे. दररोज या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदी (river) पार करून जावी लागत आहे.

दरम्यान गावातून जाणार्‍या या नदीवर कुठलाही पूल किंवा फरशी नसल्याने पुराच्या पाण्यातून एकमेकांच्या साह्याने दररोज नदी ओलांडावी लागते. या गावातून बरचसे विद्यार्थी शिक्षणासाठी (education) परिसरातील इतर मोठ्या गावांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दररोज ये जा करत असतात. दररोज अशी कसरत करावी लागते. दरम्यान जोरण ते जुना नळवाडी रस्त्यावर हे नदी पात्र असून याच नदीपात्रात जोरण येथील मायनर डॅम (Minor Dam) देखील आहे. साधारण 40 ते 50 विद्यार्थ्यांना हे नदीपात्र पार करून शाळेसाठी जावे लागते.

सध्या गत एक महिन्यापासून तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस (rain) सुरू आहे .त्यामुळे परिसरातील सर्व नद्या नाले दुथडी भरून वाहत आहे. असे असतानाही पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी पालक दररोज आपल्या पाल्याला कडेवर किंवा खांद्यावर घेऊन नदी पार करून देतात. गेल्या अनेक दिवसांपासून या विद्यार्थ्यांची (students) ही अवस्था आहे. अनेकदा पालक आणि नागरिकांनी शासनदरबारी आपली कैफियत मांडली पण या नदीपात्रावर शासनाने पूल मात्र उभारला नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

एकीकडे शिक्षणाचा मूलभूत अधिकारांतर्गत ग्रामीण भागातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षण (education) मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असतांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या नदीपात्रात पूल उभारून येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी जोरण येथील विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

जोरण येथील 40 ते 50 विद्यार्थी रोज शाळेसाठी इतरत्र जात असतात. पावसाळ्यात मात्र या विद्यार्थ्यांना जोरण ते जुना नळवाडी रस्त्यावरील नदी ओलांडून जावे लागते. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असते. अशावेळी जीव धोक्यात घालून शालेय विद्यार्थ्यांना पात्र ओलांडावे लागते. या ठिकाणी फरशी किंवा पूल बांधून मिळावा, यासाठी आतापर्यंत अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा केला. पण अद्यापही त्याला यश मिळाले नाही.

- अरुण कड, शिवसेना उपतालुका समन्वयक, दिंडोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com