खंडोबा टेकडीवर असुविधा; पर्यटक नाराज

खंडोबा टेकडीवर असुविधा; पर्यटक नाराज

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

निर्बंधात शिथिलता आल्यानंतर देवळालीचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांनी हळूहळू गजबजू लागला आहे. येथील खंडोबाची टेकडी म्हणजे नाशिककरांसह बाहेरगावच्या अनेक भाविक व पर्यटकांच्या अगदी आवडीचे ठिकाण आहे. नाशिक शहरापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर ही टेकडी आहे. सतरा एक्कर जागेच्या छोट्याश्या टेकडीवर साडेतीन गुंठे जागेत खंडेराव मंदिर Khanderao Temple आहे.

टेकडीच्या आजूबाजूचा बहुतांश भाग हा लष्कराच्या ताब्यात असल्याने मंदिराकडे जातानाच त्याचा अनुभव येतो. टेकडीला पोहचल्यावर टेकडी चढण्यासाठी असलेल्या रस्त्यावरचं जवान उभे असतात. पायर्‍यांच्या सुरुवातीला टेकडी संदर्भातील माहिती लिहिलेला फलक आहे. चंपाषष्ठीनिमित्त येथे भरणार्‍या यात्रोत्सवासाठी अवघ्या जिल्ह्याभरातुन भाविक प्रति जेजुरी म्हणून दर्शनासाठी गर्दी करत असतात. मंदिर परिसरात पर्यटकांसाठी येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने विश्वस्थांचा सहाय्याने श्रॉफ परिवाराच्या दातृत्वातून सिंधू वेल्फेअर ट्रस्टने टेकडीवर चढून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायर्‍या, पर्यटकांच्या सोयीसाठी येथे उद्यान, खेळण्या, स्वच्छतागृह व कुस्तीचा आखाडा व व्यायामासाठी आवश्यक असे साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे.

मंदिराच्या बाहेरील तटबंदीलगत पिण्याच्या पाण्याची सोयही उपलब्ध आहे. प्रशासनाच्या वतीने येथे महिला व पुरुष असे स्वतंत्र स्वछतागृह उभारण्यात आले आहे. सध्या मंदिराची देखभाल भगूर येथील आमले परिवाराकडून होत असते. तर बाहेरील उद्यान व परिसर याकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड विविध सुविधा पुरवत असते. टेकडीवरील बालोद्यानात असलेले लहान मुलांचे झोके तुटलेल्या अवस्थेत आहे. तर पायर्‍यांची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.पायर्‍यांच्या उजव्या बाजूला असलेला एक कारंजा गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.

पायर्‍या चढतांना व बालोद्यान व परिसरात जंगली गवत, झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे. बोर्ड प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष वेधण्याची गरज निर्माण झाली आहे. पुढील महिन्यात चंपाषष्ठी असल्याने येथील दुरावस्थेबाबत स्थानिक नागरिकांसह भेट देण्यासाठी येणार्‍या पर्यटकांमधून नाराजीचा सूर निघत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com