विभागीय पुरवठा कार्यालयात नागरिकांची गैरसोय

जिल्हाधिकार्‍यांना शेख यांचे निवेदन
विभागीय पुरवठा कार्यालयात नागरिकांची गैरसोय

नाशिक । प्रतिनिधी | Sinnar

वेळोवेळी नागरिकांना विभागीय पुरवठा कार्यालयात (Divisional Supply Office) होत असलेल्या समस्यांवबत जिल्हाधिकारी गंगाठरण डी. (Collector Gangatharan d.) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष नदीम शेख (Nadeem Sheikh, Head of Minorities Department ) यांनी निवेदन (memorandum) दिले आहे.

दरम्यान, जागतिक महिला दिनाचे (World Women's Day) औचित्य साधत संबंधित महिलांनी सुमारे 40 महिलांसह धान्य वितरण कार्यालयात गेल्या असतांना तेथे धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे (Grain Distribution Officer Shweta Patole) ह्या रजेवर गेल्या असल्याचे व त्यांचे पश्चात प्रभारी धान्य वितरण अधिकारी (Grain Distribution Officer) म्हणून कैलास पवार यांची नेमणूक जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करणेत आल्याचे समजले. परंतु कैलास पवार यांची ज्या तारखेस नियुक्ती जाहीर केली त्या तारखेपासून ते निवेदन (memorandum) दाखल तारखेपर्यंत उपस्थितीच नसल्याचे जाणवले.

दरम्यान, यावेळी उपस्थित महिला पदाधिकारी (Women office bearers) व नदीम शेख यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर कैलास पवार यांना धान्य वितरण अधिकारी (Grain Distribution Officer) म्हणून पदभार स्विकारायचाच नव्हता तर त्यांनी नियुक्ती का मान्य केली? त्या अनुपस्थितीमुळे लाखो नागरीकांचे रेशनिंगचे कामकाज ठप्प झालेले आहे. नागरीक व महिला भगिनी धान्य वितरण कार्यालयात आपल्या कामासाठी वारंवार चकरा मारुन त्रासलेले आहेत.

येत्या 8 दिवसात न मिळाल्यास राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेस विभाग यांचेवतीने तिव्र स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल. त्यापासून होणार्‍या विपरीत परिणामास आपण व जिल्हा पुरवठा अधिकारी व धान्य वितरण अधिकारी हेच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com