
नाशिक | Nashik
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी आयकर (Income Tax Department) विभागाने छापे टाकले होते. त्यात शहरातील अनेक नामांकित बिल्डरर्सच्या कार्यालयांवर छापा टाकण्यात आला होता. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. हे छाप्याचे सत्र सलग चार दिवस चालल्याने बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले होते. त्यातच आता शहरात पुन्हा एकदा आयकर विभागाने छापा टाकल्याची घटना समोर आली आहे...
चार चाकी गाड्यांचे पार्ट्स बनविणाऱ्या एका मोठ्या कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी केली असल्याने नाशिकच्या उद्योग (Nashik MIDC) क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सातपूर (Satpur) परिसरात असलेल्या कंपनीत सकाळपासून आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बिल्डरांच्या कार्यालयांवर छापा टाकण्यात आला होता, त्यानंतर आता औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत आयकर विभागाने पहाटे ६ वाजेच्या सुमारास आयकर विभागाच्या ६ ते ७ जणांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी अचानक येत कारवाईस सुरवात केली.
जवळपास चार तासांपासून इथे चौकशी सुरु असून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आयकर विभागातील बड्या अधिकाऱ्यांसह विशेष पथकाने आज सकाळी छापा टाकला असून पथकामध्ये अनेक अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे.