नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे

नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आयकर विभागातर्फे (Income Tax Department) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) बत्तीस ठिकाणी छापे (Income tax raids) टाकत सुमारे 240 कोटींची बेहिशेबी मालमत्ता (Unaccounted assets) व सुमारे सहा कोटींची रोकड व जप्त केल्याचे समजते.

नंदुरबार (nandurbar) व धुळे (dhule) जिल्ह्यात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार (Land deals) करणाऱ्या व्यावसायिक, सरकारी कंत्राट (Government contractors) घेणारे 10 ते 12 ठेकेदार (contractors) त्यांच्याशी संबंधित बांधकाम व्यावसायिक (Builders) यांच्या निवासस्थाने व कार्यालयांवर छापे टाकल्याची गोपनीय माहिती मिळते. दरम्यान ज्यांच्यावर छापे पडले त्यांचे नातलग व भागीदार असणाऱ्या नाशकातील तीन ठिकाणी छापे पडले.

यात, काॅलेज राेडवरील (college road) डिसुझा कॉलनीतील (D'Souza Colony) व्यावसायिकाच्या निवासस्थानी व त्यांच्या देवळाली कॅम्प (deolali camp) व भगूर (bhagur) येथील कार्यालयात झडती घेण्यात आल्याची गोपनीय माहिती सुत्रांच्या माध्यमातून मिळते.पथकाने नंदुरबारमध्ये (दीडशेहून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवार ( दि.२२) ते रविवारी (दि.२६) पर्यंत कारवाई केली. मिळालेली सहा कोटींची रोकड मोजण्यासाठी सुमारे १२ तास लागले.

नाशिकच्या (nashik) अन्वेषण विभागाने (Investigation Department) नागपूर (nagpur), पुणे (pune), ठाणे (thane), कल्याण (kalyan) विभागातील अधिकाऱ्यांना बाेलावून घेत एकाच वेळी अधिकाऱ्यांची पथके तयार करत गुजरातमधून धुळे मार्गे, तर काही नवापूरमार्गे वेगवेगळ्या रस्त्याने नंदुरबारमध्ये दाखल झाली. पहिल्या दिवशी संबंधितांचे नातलग व भागीदारांची माहिती मिळताच धुळे व नाशिककडे दुसऱ्या पथकांनी छापे टाकल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com