'नमामि गंगेत’ 'या' नदीचा समावेश करा; निसर्गसेवक युवा मंच करणार आंदोलन

'नमामि गंगेत’ 'या' नदीचा समावेश करा; निसर्गसेवक युवा मंच करणार आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्मार्ट सिटी (Smart City) अंतर्गत किंवा नमामि गंगा प्रकल्पांतर्गत (Namami Ganga Project) नंदिनी नदीचा (Nandini River) समावेश करून नंदिनी नदीच्या शुद्धीकरणासाठी कामे करावीत,

अशी मागणी निसर्गसेवक युवा मंचचे (Nisargasevak Yuva Manch) संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकड निवेदनाद्वारे (memorandum) केली आहे.

यासंदर्भात महापालिकेकडे वारंवार पाठपरावा करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांकडे मागण केल्याचे सांगतानाच नंदिनी नदीचा (Nandini River) समावेश नमामी गोदा उपक्रमात न झाल्यास आंदोलन (agitation) करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी टाकळी येथे 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी या नदीला नंदिनी नामकरण केलेले आहे.

त्यामुळे आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेल्या नंदिनी (नासर्डी) नदीची अवस्था आज अतिशय बिकट झालेली आहे. औद्योगिक रासायनिक सांडपाणी (Industrial Chemical Wastewater) व कचर्‍याचे प्रदूषण, भूमिगत गटारींंचे (Underground sewers) थेट पाणी यामुळे ह्या नदीचे रूपांतर नाल्यात होउ लागलेले आहे. शहरात कुंभमेळ्यासाठी (Kumbha Mela) येणार्‍या भाविकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.

गोदावरी नदीची (godavari river) उपनदी असलेल्या नंदिनी नदीच्या संपूर्ण पात्राची व तिला मिसळणार्‍या नैसर्गिक नाल्यांच्या पात्रांची मोजणी करून नदीपात्राच्या कडेला ग्याबलियन वॉल बांधून पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात व तिचे संरक्षण व नाशिक शहरातील मुख्य नदी आणि सुशोभिकरण करण्यात यावे. अशी मागणीही या संस्थेने केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com