विकास आराखड्यात नांदुरीचा समावेश करा; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना निवेदन

विकास आराखड्यात नांदुरीचा समावेश करा; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना निवेदन

नांदुरी । वार्ताहर | Nanduri

महाराष्ट्र राज्याचे (State of Maharashtra) बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे (Ports and Mines Minister and Guardian Minister Dada Bhuse) यांनी सप्तशृंगीगडासह (Saptshrungi gad) नांदुरी (nanduri) गावातील विकास कामांसाठी आराखडा (Plan for Development Works) तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

नवरात्र उत्सवास (navratrotsav) स्वतः पालकमत्र्यांनी नांदुरी गावातील वाहनतळासह भाविकांची व पोलीस प्रशासनासह (Police Administration) एस.टी. महामंडळाच्या (ST corporation) कर्मचार्‍यांसह आधिकार्‍यांसह प्रशासनाचे हाल हवाल परिस्थिती बघितली. खान्देशातील भाविकांचे सप्तशृंग पायी येण्याचे प्रमाण जास्त असून त्यासाठी या येणार्‍या भाविकांना पाहिजे त्या सुविधा उपलब्ध होतांना दिसत नाही.

यासाठी सप्तशृंगीगड (Saptshringi gad) तीर्थक्षेत्र विकासासह नांदुरी गावालाही या विकास आराखड्यात सहभागी केले असल्याने यात्रा उत्सवात नांदुरी ग्रामपंचायतीस मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागते. परंतु येणार्‍या भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी विकास आराखड्यात सहभागी होणे महत्त्वाचे होते. गरज ओळखून सन्माननीय पालक मंत्र्यांनी नांदुरी गावाला लागणार्‍या सोयी सुविधांसह पाण्याची प्रमुख समस्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः जागेवर जाऊन पहाणी करण्याचे सांगितले तसेच

नांदुरी ते सप्तशृंग गड या चार किलोमिटरच्या रडतोंडी (घाट) यारस्त्याचे ही दुरुस्त (road repair) करुन सुशोभीकरणासाठी (beautification) आराखडा तयार करावा असे सांगितले. यावेळी नांदुरी ग्रामपंचायतीच्या वतीने विकास कामांचे प्रस्ताव सादर पत्र यावेळी दिले. दिलेल्या सर्व मागण्यांची दखल घेवून लवकरच मार्गी लागावी, अशी मागणी नांदुरी गावच्या वतीने सरपंच सुभाष राऊत, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी केली आहे.

या मागण्यांचे निवेदन

भाविकांसाठी भक्त निवास, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय., सप्तशृंग ट्रस्टसाठी नांदुरी गावात रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करणे, गावांतर्गत रस्ते, गावात जागोजागी सी.सी.टीव्ही.बसविणे, वाहनतळाच्या पोलिसांसाठी पोलिसठाणे, प्रमुख अतिथीसाठी हेलिपडची व्यवस्था, पुरुष व महिलासांठी स्वतंत्र शौचालय बांधणे, निवारा शेड बांधणे, पायी जाणार्‍या मार्गावर जागोजागी जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, आधुनिक सोयीसुविधायुक्त बसस्थानक उभारणे, व्यापारी संकुल उभारणे, जि.प. केंद्र शाळा इमारत संरक्षण भिंत विद्यार्थांसाठी शौचालय, संपूर्ण गावात बंदिस्त विद्युत पुरवठा, पहिली पायरी ते भोवरी नाला रस्ता तयार वाचनालय बौद्धविहार गावाला पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लँन्ट उभारणे आदी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com