घंटागाडीच्या निविदेत सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांची अट समाविष्ट करा

नगरसेवक सलीम शेख यांची आयुक्तांकडे मागणी
घंटागाडीच्या निविदेत सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांची अट समाविष्ट करा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक मनपाच्या NMC केरकचरा संकलन करणार्‍या सर्व घंटागाड्या Ghantagadi या पर्यावरण संरक्षण करण्याच्या उद्देशाने सीएनजी व इलेट्रिक CNG or Electrical vehicles असण्याची अट निविदेत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख MNS corporator Salim Shaikh यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना पत्र देऊन केली आहे.

सध्या पर्यावरणाची समस्या अतिशय गंभीर आहे. ही समस्या दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सीएनजी व इलेट्रिक गाड्यांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम हाती घेत आहे. गत महासभेतच प्रशासनाने याबाबत प्रस्ताव देखील महासभेवर सादर केला होता. परंतु प्रशासन घंटागाडी निविदेच्या बाबत मात्र संशयाची भूमिका घेत आहे.

सुमारे 400 वा त्यापेक्षा जास्त घंटागाड्या शहरात गल्लीबोळात धावणार आहे. यापैकी ठरावीक गाड्याच सीएनजी असल्याची अट समाविष्ट आहे. परंतु ही अट सर्वच घंटागाडी बाबत लागू केली तर डिझेल गाड्यांमुळे होणारी पर्यावरणची मोठी हानी कमी होईल व शहराचा पर्यावरण स्तर उंचावण्यास मदत होईल, असे पत्रात म्हटले आहे.

केंद्र शासन व सर्वोच्च न्यायालयाने देखील पर्यावरण समस्येवर चिंता व्यक्त करीत विविध दिशानिर्देश व आदेश पारित केलेले आहे. तसेच या कामी इलेट्रिक वाहनाच्या खरेदीवर अनुदान देखील दिलेले आहे. त्यामुळे आपल्या मनपाने देखील घंटागाडी या सीएनजी व इलेट्रीक स्वरूपात घेण्याची सक्ती केल्यास पर्यावरण संरक्षण होणेस हातभार व मनपा ठेकेदारांना इंधनपोटी जो खर्च देणार आहे त्यात मोठी बचत होईल व मनपाला आर्थिकदृष्ट्या या निविदेतून एक मोठी बचत होऊन जनतेला सामाजिक संदेश देखील देता येईल तसेच यासाठी केंद्र व राज्य शासन कडून विशेष अनुदान देखील मिळवण्यासाठी प्रयत्न करता येईल. असे शेख यांनी सांगितले आहे.

याबाबतची मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री व राज्याचे पर्यावरण मत्री आदित्य ठाकरे तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनादे खील पाठवली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com