'या' कारणामुळे हृदयविकाराचे प्रमाण जास्त

'या' कारणामुळे हृदयविकाराचे प्रमाण जास्त

ओझर। वार्ताहर | Ozar

वाढत्या शहरीकरणामुळे (Urbanization) अंग मेहनतीचे काम कमी होऊ लागले आहे. पुरेसा व्यायाम (Exercise) न करणे व त्यातल्या त्यात ताणतणाव (Stress) वाढत चालल्यामुळे हृदयविकाराचे (Heart disease) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे प्रतिपादन नाशिक (nashik) येथील लोकमान्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे (Lokmanya Multispeciality Hospital) हृदयविकार सर्जन डॉ.निलेश पुरकर (Cardiologist Dr. Nilesh Purkar) यांनी केले आहे.

जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्था ओझर व लोकमान्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, धात्रक फाटा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर (ozar) येथे आयोजित करण्यात आलेल्या संपूर्ण हृदय तपासणी शिबिर (Cardiac Examination Camp) कार्यक्रमात डॉ.पुरकर बोलत होते. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा लता टर्ले, दिनकर वाघचौरे, सूर्यभान ठाकरे, डॉ. निलेश तावडे, डॉ.रोहीत ठाकरे, उद्योजक बी.पी. शिंदे उपस्थित होते. जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात झालेल्या हृदय तपासणी शिबिरामध्ये 130 ज्येष्ठ नागरिकांची बीएमआय (BMI), बी.पी. (BP), रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood sugar level), ईसीजी (ECG) व कन्स्लटेशन करून हृदय तपासणी करण्यात आली.

डॉ.पुरकर यावेळी बोलताना म्हणाले की, भारतामध्ये हृदयविकार वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढते शहरीकरण, वाढते वय, अनुवंशिकता, उच्च रक्कतदाब, वाढलेले वजन व सर्वात महत्वाचे सांगायचे तर ताणतणाव यामुळे हृदयविकाराचे (heart attack) प्रमाण अधिक वाढत आहे. यासाठी नागरिकांनी आहार-विहाराबरोबर पुरेसा व्यायाम केला पाहिजे व टेन्शन फ्री (Tension free) जगायला शिकले पाहिजे. तसेच जंक फुड, तंबाखू व मद्य या व्यसनांपासून दूर राहीले तर हृदयविकाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हृदयाच्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी हृदयविकार तज्ज्ञ डॉ.रोहीत ठाकरे व डॉ.निलेश तावडे यांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठांच्या जीवन जगण्याच्या टीप्स दिल्या व ज्येष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन ज्येष्ठांच्या शंकांचे निरसन केले. प्रास्ताविक संघाच्या अध्यक्षा लता टर्ले यांनी केले. सूर्यभान ठाकरे यांनी मान्यवरांचा सत्कार व सूत्रसंचालन केले तर दिनकर वाघचौरे यांनी आभार मानले. शिबीर यशस्वीतेसाठी कुमुदिनी महाडीक, गंगाधर बोरसे, भीमराव महाडीक, तुकाराम गावडे, पार्वताबाई शिंदे, उषा पराड, माणिक थोरात आदींनी परिश्रम घेतले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com