आशा,गट प्रवर्तकांंना प्रोत्साहन भता लागू

महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटनेकडून निर्णयाचे
आशा,गट प्रवर्तकांंना प्रोत्साहन भता लागू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आशा ( Aasha Workers ) व गट प्रवर्तक यांना करोना कामाचा ( Corona) एक हजार रुपये दरमहा प्रोत्साहन भता ( Incentive ) लागू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत घेतला आहे.

जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ( ZP-CEO- Leena Bansod ) यांचा आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटना यांच्यावतीने राज्य अद्यक्ष कॉम्रेड राजू देसले, आशा व गट प्रवर्तक,ज्योती गोडसे अरुणा आव्हाड, मंगल गोडसे,अश्विनी डेंगळे यांनी पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन आभार मानले.

जिल्यातील 3700 आशा व 300 गट प्रवर्तकाना याचा लाभ होणार आहे . ग्रामपंचायत मार्फत प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

या निर्णयाचा आशा व गट प्रवर्तक यांना न्याय द्यावा. तसेच आरोग्य केंद्रात व उप केंद्रात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचर यांनाही प्रोत्साहन भत्ता अल्प मानधनावर कार्यरत महिलांना द्यावा.संप काळात आशा व गट प्रवर्तक यांच्या मागण्या राज्य सरकारकडे पाठवून सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. जिल्हा परिषद नाशिक व ग्रामपंचायत उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांचे आभार व्यक्त केले.

नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील एक आशा कर्मचारी करोना बाधित झाल्यावर पतीही बाधित झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्या आशा ताईच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत जिल्हा परिषद मार्फत मिळावी,अशीही मागणी करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात कार्यरत काही आशाना ऑक्सिमिटर व गन दिली होती.त्यांचा सातत्याने वापर केल्यामुळे बंद पडल्या आहेत. याची नोंद घेऊन येणाऱ्या काळात संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी आशा, गट प्रवर्तक यांना संरक्षक साहित्य उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी अध्यक्ष राजू देसले यांनी यावेळी केली..

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com