ओला कचरा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

ओला कचरा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

पिंपळगाव ब.। वार्ताहर | Pimpalgaon Basvant

येथील ओला कचरा प्रक्रिया केंद्र (Waste processing center) व प्लॅस्टिक बेलींग युनीट (Plastic Belling Unit) चे उद्घाटन गुढीपाडव्याच्या (Gudipadva) मुहूर्तावर झाले.

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचा (Pimpalgaon Basvant Grampanchayat) गेली 25 वर्षापासून निफाड (niphad) रोड वरील डंपिंग ग्राऊंड (Dumping ground) असून अनेक वर्षापासून या परीसरातील नागरिकांना या डंपिंग ग्राऊंड मुळे प्रदूषणाचा त्रास होत होता. दोनच वर्षापासून या प्रकल्पाचे काम सुरू होते.

ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांच्या प्रय्तनातून एच.ए.एल (HAL) च्या सी.एस.आर फंडातून (CSR Fund) सुमारे 66 लाख 25 हजार रूपयांचा ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प हा महाराष्ट्रातील (maharashtra) ग्रामपंचायतीचा दुसरा प्रकल्प पिंपळगाव बसवंत येथे उभारण्यात आला.

या प्रकल्पातून बायोगॅस (Biogas) व विजनिर्मिती (Power generation) होणार असून सांडपाण्याचे व्यवस्थापन यातूनच होणार आहे. तसेच प्लॅस्टिक ची समस्या (problem with plastic) दिवसेंदिवस मोठी समस्या बनली असून या समस्येवर मात करण्यासाठी एच.ए.एल (HAL) च्या सी.एस.आर फंडातून सुमारे 15 लाख रूपये खर्चून या प्लॅस्टिक बेलींग युनीट चे देखील उद्घाटन करण्यात आले.

या दोन्ही प्रकल्पामुळे परीसरातील अनेक समस्या दूर झाल्या असून घनकचरा व्यवस्थापन करणारी राज्यातील ही दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन एच.ए.एल चे वरीष्ठ अधिकारी अलोक वर्मा, डी.महेती, दीपक सिंगल, साकेत चतुर्वेदी, एच.जी. भोलेसर, आ.दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस आ.दिलीप बनकर यांनी एच.ए.एल च्या माध्यमातून जो निधी (fund) उपलब्ध करून दिला त्याबद्दल आभार मानत या पुढील काळात पिंपळगाव बसवंत येथे भव्य जलतरण तलावाचे काम देखील एच.ए.एल च्या सहकार्यातून व्हावे.

तसेच निफाड तालुक्यातील गावांसाठी एच.ए.एल ने मदत करावी अशी विनंती यावेळी अधिकार्‍यांना केली. याप्रसंगी सरपंच अलका बनकर, उपसरपंच बापु कडाळे, ग्रामसेवक लिंगराज जंगम आदींसह बाळासाहेब बनकर, सुहास मोरे, संजय मोरे, अंकुश वारडे, दीपक मोरे, सत्यभामा बनकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.