लासलगावात विविध विकासकामाचे उद्घाटन

लासलगावात विविध विकासकामाचे उद्घाटन

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

15 वित्त आयोग निधीतून (Finance Commission Fund) ब्राह्मणगाव वनस (Brahmangaon Vanas) येथील 5 लाख रुपयांच्या शौचालय कामाचे भूमिपूजन (bhumipujan) तसेच 10 लाख रुपयांच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत डांबरीकरण झालेल्या वनसगाव ते ब्राह्मणगाव रस्त्याचा लोकार्पण सोहळा

निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुरासे (Former President of Niphad Panchayat Samiti Shiva Surase) यांच्या हस्ते तसेच सरपंच प्रमिला चौधरी, उपसरपंच नरहरी कापडी, वनसगावचे माजी सरपंच शिवसेना शाखाप्रमुख एकनाथ शिंदे, वनसगावचे माजी सरपंच किरण शिंदे,

उत्तम जाधव, भरत गारे, निरंजन शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी सुरासे म्हणाले की, 40 ते 50 लाख रुपयांची विविध विकासकामे त्यामध्ये रस्ता डांबरीकरण, व्यायामशाळा बंधारा बांधणे, जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी शेड, गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण तसेच शौचालय बांधणे आदी विविध विकासकामे केली आहे.

शिवाय राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत (National Drinking Water Scheme) 90.56 लाख रुपयांची पाणी योजना मंजूर (Water plan approved) असून टेंडर प्रोसेसिंग चालू असून तिचे लवकरच उद्घाटन सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थिती करण्यात येईल. यावेळी उपसरपंच नरहरी कापडी, ग्रामसेवक रसाळ, दीपक शिंदे, ग्रा.पं. सदस्य भाऊसाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य रावसाहेब कडाळे, योगेश वाघ, महेंद्र भालेराव, संजय वाघ, पोलीस पाटील रवी गोसावी, रतन शिंदे, सुनील शिंदे, पोपट शिंदे, दीपक शिंदे, योगेश शिंदे, दत्ता विरोळे, गणेश शिंदे, बाळासाहेब भालेराव, बाळासाहेब शिंदे आदींसह वनसगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com