पोलीस मुख्यालयात अभ्यासिकेचे उद्घाटन
पोलीस मुख्यालयात अभ्यासिकेचे उद्घाटन
नाशिक

पोलीस मुख्यालयात अभ्यासिकेचे उद्घाटन

गुणवंत पोलीस पाल्यांचा गौरव

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक | Nashik प्रतिनिधी

पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या अरविंद अभ्यासिकेचे उद्घाटन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दहावीत ९० टक्केहून अधिक गुण मिळवणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांचा गौरव यावेळी करण्यात आला.

दरम्यान, पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या नव्या अभ्यासिकेस राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे नाव देण्यात आले. तसेच या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.

नुकताच दहावीचा निकाल जाहिर झाला. त्यात पोलीस आयुक्तालयात सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनीही यश संपादन केले. त्यानुसार ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यात कृष्णा दीपक गिरमे, वैदेही विनोद बाेडके, सिद्धेय किशोर सुर्यवंशी, यश अशोक वारघडे, तेजस्विनी संजय सानप, यश संतोष गोसावी, ऋषिता यशवंत महाजन, कृष्णा संजय सानप, सुयश संजय वाघमारे, चेतन दीपक गवळी, वैशाली संपत बोडके यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या रोशन कैलास बुवा यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, विजय खरात यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com