संस्कृत भाषा सभेचा सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ

संस्कृत भाषा सभेचा सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

इंंग्रजी संभाषणाला जेवढी प्रतिष्ठा मिळाली तेवढी संस्कृत संभाषणाला ( Sanskrit Language ) मिळाली व संंस्कृत ठराविक लोकांपुरते मर्यादित न राहता तिच्या प्रचार-प्रसरासाठी सर्वांनी प्रयत्न केले तर संस्कृत भाषेलाही नवसंजीवनी मिळल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खा. डॉॅ. विनय सहस्रबुद्धे (MP. Dr. Vinaya Sahasrabuddhe ) यांनी व्यक्त केला.

संस्कृत भाषा सभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ ( Inauguration of the golden jubilee year of Sanskrit Bhasha Sabha )व सभेचे संस्थापक कै. डॉ. वि. म. गोगटे यांच्या स्मृती पुरस्काराचे वितरण आज डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, सावानाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष संजय करंजकर, देवदत्त जोशी, संस्कृत भाषा सभेचे अध्यक्ष रमेश देशमुख आदी उपस्थित होते.

डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, केवळ संस्कृत भाषेचे गोडवे गाऊन व महत्त्व सांगून किंवा चिंता व्यक्त करून चालणार नाही. त्यासाठी परिपूर्ण मागोवा घ्यावा लागेल. संस्कृतमधील अभिलेखांची संख्या तीन कोटींच्या जवळपास आहे. ती जतन करणे गरजेचेे आहे. केवळ देववाणी भाषा म्हणून चालणार नाही तर ती प्रत्येकाच्या मुखातून कशी व्यक्त होईल, संस्कृतपासून कोणीही वंचित राहणार नाही असा प्रयत्न गरजेचा आहे, असे ते म्हणाले.

देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, आयुर्वेदाचार्य डॉ. वि. म. गोगटे यांंनी शहरात संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसारा व्हावा या उदात्त हेतूने संस्कृत भाषा सभेची स्थापना केली. गेली 50 वर्षे ही संस्था संंस्कृतच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. शासकीय अनुदान नसताना लोकाश्रयाच्या बळावर संस्थेचा कारभार सुरू आहे. आता मराठी संस्कृत शब्दकोष निर्मिती केली जाणार आहे. संस्कृत शिक्षकांचे अधिवेशन घेणार आहे. 50 वर्षांतील संस्कृत मराठी व्याख्यात्यांची सीडी तयार केली जाणार आहे, असे ते म्हणाले.

संस्कृत भाषा सभेचे संस्थापक कै. डॉ. वि. म. गोगटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र डॉ. विकास गोगटे, उद्योजक विवेक गोगटे यांंनी आपल्या गोगटे परिवारातर्फे 21 हजार रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. तो पहिला पुरस्कार सभेचे अध्यक्ष रमेश देशमुख व संस्कृतच्या अभ्यासक सरिता देशमुख यांना डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. विकास गोगटे, विवेक गोगटे, विनायक गोगटे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शोभा सोनवणे, तेजश्री वेदविख्यात, उल्हास कुलकर्णी, मीना पत्की, अंकुश जोशी, अमित नागरे, कोठावदे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com