
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पेन्सिल पोर्ट्रेट प्रदर्शन "तेरा मै" या अविनाश कुलकर्णी यांच्या व्यक्तिचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन दि. १२ ते १४ मे २०२३ रोजी करण्यात आले आहे...
दि. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता आर्ट ऑफ लिव्हिंगचे उल्हास पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन सर्वात्मक आर्ट गॅलरी, बापू बंगळ्याजवळ, इंदिरानगर येथे सर्वांसाठी खुले आहे.
अविनाश कुलकर्णी यांनी वयाच्या 67 व्या वर्षी पोर्ट्रेट विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी कला-साधना सुरू केली आहे. प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. या प्रदर्शनासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.