दिंडोरी । प्रतिनिधी

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर स्वस्थ सारथीचे आयोजन करण्यात आले आहे. झेप बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या शिबिराचे संयोजन करण्यात आले आहे. दिंडोरी येथील 2 दिवसीय शिबिराचे उद्घाटन खासदार भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे अधिकारी येस हलधर, संदीप श्रीवास्तव, एच शर्मा, निलेश इंगोले, राजेश पांडे, अमित गर्ग दीपक मुकादम, आदित्य रामदासी, भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, शाम मुरकुटे, प्रमोद देशमुख, तुषार वाघमारे, अमर राजे, भास्करराव बोराडे, विवेक कुलकर्णी, दत्तात्रय जाधव, मणियार चाचा, काकासाहेब देशमुख, संजय राजे, भास्करराव कराटे, काका देशमुख, रणजित देशमुख, सूचित देशमुख उपस्थित होते.

सीएनजी पर्यावरण पूरक असल्याने ग्रामीण भागातही सीएनजी, पिएनजीचे जाळे विस्तारावे अशी अपेक्षाही याप्रसंगी खा. डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. यावेळी या शिबिराला सहकार्य करणार्या डॉक्टर्स, दिंडोरीतील टॅक्सी युनियनच्या पदाधिकारी, रिक्षा चालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शिबिर यशस्वीतेसाठी टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष संजय राजे, सचिव भास्कर बोराडे, गणेश जाधव, उत्तम माळेकर, दशरथ निकम, किशोर मराठे, दिपक मल्ले, भास्कर सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.