उद्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन

'दोन वर्षे जनसेवेची' महाविकास आघाडीची मोहीम
उद्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ मोहिमेंतर्गत ( Mahavikas Aghadi campaign of public service for two years ) नाशिक विभागीय माहिती कार्यालयाने शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 1 मे रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे, अशी माहिती उपसंचालक (माहिती) ज्ञा. ना. इगवे यांनी दिली आहे.

विभागीय माहिती कार्यालय, नाशिकच्यावतीने ‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची मोहिमेंतर्गत 1 ते 5 मे 2022 या कालावधीत राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन मीडिया सेंटर बी. डी. भालेकर मैदान, कवी कालिदास कलामंदिरासमोर करण्यात आले आहे.

या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे, आरोग्य व कुटुंब कल्याण, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खा. हेमंत गोडसे, आ. डॉ. सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीपराव बनकर, मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुहास कांदे, नितीन पवार, अ‍ॅड. राहुल ढिकले, हिरामण खोसकर, सरोज आहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित राहणार आहेत.

या राज्यस्तरीय प्रदर्शनात गेल्या दोन वर्षात शासनाने करोनासारख्या कठीण काळात केलेली कामगिरी, कृषी, आदिवासी विकास, शिवभोजन, महाआवास योजना, आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासह समाजातील सर्वच घटकांचा सर्वंकष विकास अशा विकासात्मक कामकाजाची माहिती या प्रदर्शनात सचित्र पद्धतीने देण्यात येणार आहे.

1 ते 5 मेपर्यंत प्रदर्शन

हे राज्यस्तरीय प्रदर्शन नागरिकांसाठी 1 ते 5 मे 2022 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही उपसंचालक (माहिती) इगवे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.