माती-पाणी परीक्षण केंद्राचे उद्घाटन

माती-पाणी परीक्षण केंद्राचे उद्घाटन

सिन्नर ।वार्ताहर Sinnar

तालुक्यातील वडागंळी Vadangli येथे माती-पाणी परीक्षण केंद्राचे Soil-water testing center नकुतेच खासदार हेमंत गोडसे MP Hemant Godse यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, राजेश गडाख उपस्थित होते.

जमिनीच्या आरोग्यासाठी माती-पाणी परिक्षण आवश्यक असते. त्याचे महत्त्व, फायदे, मातीचा नमुना केव्हा, कधी, कुठे, कसा घ्यावा याचे तांत्रिक ज्ञान असणेही महत्त्वाचे आहे. माती परीक्षणावरून जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि आरोग्य समजते व पुढील पीक नियोजन करता येते असे खासदार गोडसे म्हणाले.

माती परीक्षण म्हणजे शेतातील प्रातिनिधिक नमुन्यांचे पृथक्करण करून त्यातील उपलब्ध मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून अहवालानुसार पिकाचे व खतांचे नियोजन करता येते. वडांगळी येथे या केद्राची स्थापना झाल्याने पुर्व भागातील शेतकर्‍यांना आता माती-पाणी परिक्षण करणे सोयीचे होणार असून आपल्या जमीनीची सुपीकता व पिकांचे नियोजन करण्यास मदत होणार असल्याचे राजाभाऊ वाजे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com