स्मार्टपुर डिजिटल सेंटरचे उदघाटन

स्मार्टपुर डिजिटल सेंटरचे उदघाटन

सिन्नर । वार्ताहर Sinnar

सीवायडीए संस्थेतर्फे तालुक्यातील पांगरी pangri येथे ‘स्मार्टपुर डिजीटल सेंटर ’ची Smartpur Digital Center सुरुवात करण्यात आली आहे. डिजीटल सेंटर सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले.

देशातील 4 राज्यात संस्थेमार्फत स्मार्टपूर प्रकल्प राबविण्यात येत आहे. सिन्नर मधील 20 गावासोबत हा उपक्रम सेव्ह द चिल्ड्रन व सी.वाय.डी.ए. Save the Childrens & CYDA यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येत असून याअंतर्गत शिक्षण, उपजिविका, शासकीय योजना, आथिर्क समावेशन व आरोग्य या घटकांना सोबत घेऊन काम करत आहे.

प्रकल्प अंतर्गत 20 गावामध्ये स्मार्टपुर केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पांगरी येथे बनसोड याच्या हस्ते केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी स्मार्टपूर प्रकल्प बाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, संस्थेचे संचालक प्रवीण जाधव, धनंजय दिघे, सरपंच स्मिता निकम, बाबासाहेब पगार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी योगेश नेरपगार, भाऊसाहेब शेळके, मृणाली पिंपळकर, अक्षय चिने, विशाल बोबाटकर, ऋतुजा काळे, अविनाश सोनवणे, विकास म्हस्के, सोमनाथ पगार यांनी परिश्रम घेतले.

तंत्रज्ञानाशी जोडण्याचे माध्यम

‘स्मार्टपूर’ हा प्रकल्प ग्रामीण गाभात आधुनिक सेवा प्रदान करण्यासाठी व महिला, युवक व ग्रामीण भागातील समुदायाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे एक माध्यम connecting with modern technology आहे. याचा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या प्रकल्पाचा लाभ घेण्याचे आवाहन बनसोड यांनी कले.

Related Stories

No stories found.