सिन्नर नगरपरिषद नाट्यगृहाचे उद्या लोकार्पण

सिन्नर नगरपरिषद नाट्यगृहाचे उद्या लोकार्पण

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

नगर परिषदेच्या (Sinnar Municipal Council) वतीने शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे....

या परिसरासह नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यमंदिर, महाकवी वामनदादा कर्डक रंगमंच व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दालनाचे बुधवारी (दि.18) दुपारी चार वाजता खा. छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांच्या हस्ते लोकार्पण होत असल्याची माहिती माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau waje), नगराध्यक्ष किरण डगळे (Kiran Dagle) यांनी दिली.

ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, अ‍ॅड. शिवाजीराव देशमुख, उद्योजक नामकर्ण आवारे, उद्योजक हेमंत नाईक, सोमनाथ वाघ, उदय सांगळे, करण गायकर, डॉ. सागर सदगीर, पंचायत समितीच्या सभापती रोहीणी कांगणे, उपसभापती संग्राम कातकाडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष कचरू गंधास, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, शहरप्रमुख गौरव घरटे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नगरपरिषदेने राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. पुतळ्याच्या पाठीमागे कोरीव दगडी काम करण्यात आले आहे. बुरुज व किल्ल्यांच्या भिंतीप्रमाणे हे काम झाले असून त्यामुळे पुतळा परिसराला शिवकालीन सदृश्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

पुतळा सुशोभीकरणाचे डिझाईन जितेंद्र जगताप यांनी केले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगरसेवक प्रमोद चोथवे, विजय जाधव, शैलेश नाईक, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, श्रीकांत जाधव, रुपेश मुठे यांच्यासह शिवसेना नगरसेवकांनी केले आहे.

550 प्रेक्षक क्षमता

नाट्यमंदिराचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. एकाच वेळी 550 श्रोते बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अलिशान बैठक व्यवस्थेसह उत्कृष्ट साऊंड सिस्टिम त्यात बसवण्यात आली आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या नाट्य मंदिराचा रंगमंच तीन हजार स्क्वेअर फूट आहे. रंगमंचाला महाकवी वामनदादा कर्डक यांचे नाव देण्यात आले आहे. नाट्य मंदिराच्या जवळच क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले कलादालन उभारण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com