...तेव्हाच होईल पक्षाचे उत्तम संघटन; सेनेच्या संपर्कप्रमुखांनी दिला कानमंत्र

...तेव्हाच होईल पक्षाचे उत्तम संघटन; सेनेच्या संपर्कप्रमुखांनी दिला कानमंत्र

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

कोणत्याही पक्षाचे यश हे त्या पक्षाच्या सक्षम बूथरचनेवर अवलंबून असते. त्यामुळेच शिवसेनेने (shivsena) या यंत्रणेला गांभीर्याने घेतले आहे. बूथ प्रमुखांच्या सूचनांचा आदर करून त्यांना सातत्याने प्रोत्साहित केले जाते...

बूथ प्रमुखांनीही डोळ्यात तेल घालून आपली जबाबदारी पार पाडावी. पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी हातभार लावावा, असे आवाहन शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhary) यांनी केले.

नाशिक (Nashik) दौऱ्यावर आलेले भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते रविवारी प्रभाग क्र. 24, 25, 26, व 27 मधील अंबड गाव, गणपती मंदिर (जाधव संकूल), स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह (सावतानगर) आणि हिंदुहृदय क्रीडांगण (बडदेनगर) येथे आयोजित बूथप्रमुखांच्या मेळाव्यांचे उद्घाटन झाले. त्यावेळी चौधरी बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar), महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar), वसंत गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, महिला आघाडी नाशिक जिल्हा संपर्क संघटक रंजना नेवाळकर, विधानसभा संपर्क संघटक संगीता खोडाना, म.आ.जिल्हा संघटक मंदा दातीर, मंगला भास्कर, युवासेना जिल्हाधिकारी दिपक दातीर, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, महानगर संघटक योगेश बेलदार, डी. जी. सुर्यवंशी, प्रविण तिदमे आदी उपस्थित होते.

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले की, भाजपने (BJP) मोठ्या प्रमाणात दुबार मतनोंदणी करून २०१७ ची निवडणूक (election) कपटाने जिंकली. आपण त्यांची ही लबाडी निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मतदारयाद्या शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे.

त्यामुळे भाजपाचे अवसान पुरते गळाले आहे. परंतु ते स्वस्थ बसणार नाहीत आणि निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्याकडून नवे फंडे अजमाविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ते त्यात यशस्वी होणार नाही, याची शिवसैनिकांनी विशेषतः बूथप्रमुखांनी काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.