
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बंडखोर (rebel) व भाजप (bjp) संयुक्तपणे शिवसेनेच्या (shiv sena) कुरघोड्या करण्यात अग्रेसर असताना शिवसैनिकांचा मनोबल तुटू नये पदाधिकारी व नेत्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा शिवसेने विरोधात केल्या जाणार्या
कुटील कारस्थानाची कुंडली जनतेसमोर मांडण्याच्या उद्देशाने सर्व शिवसैनिकांना (shivsainik) प्रोत्साहित करण्यासाठी शिवगर्जना अभियानाचा प्रारंभ करण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री अनंत गीते (Union Minister Anant Gite) यांनी सांगितले.यावेळी अनंत गिते यांनी उपस्थितांना वज्रमुठ बांधून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी उभे राहण्याची सामुदायीक शपथ दिली.
राजकारणातील घडून गेलेल्या घटनांची चर्चा करण्यापेक्षा नवीन घडवण्यावर विचार करण्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावस्येला दूर करून त्यांच्यात नवचैतन्य भरुन गद्दारांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने शिवगर्जना अभियानाचा (Shivgarjana Abhiyan) प्रारंभ करण्यात आला आहे. राज्यातील पहिल्या व उत्तर महाराष्ट्राच्या या अभियानाला प्रारंभ नाशिकमधून (nashik) करण्यातयेत असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक घेत राज्यभरातील विविध भागांसाठी पाच जणांच्या स्वतंत्र समित्यांची नेमणूक केली आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक भागामध्ये शिवसैनिकांना एकत्रित करून ज्येष्ठ शिवसैनिकांना पुन्हा पक्षकार्यात कार्यरत करून संघटनेचे काम तळागाळातील जोडण्याचे उद्दिष्ट दिले आहे. उत्त्र महाराष्ट्रातील नाशिक व लासलगाव (lasalgaon) येथे धुळे (dule), नंदुरबार (nandurbar) येथे स्वतंत्र बैठका घेतल्या जाणार आहेत.
येत्या तीन मार्च पर्यंत नाशिक व उत्तर महाराष्ट्र अभियान राबविला जाणार आहे दि.5 मार्चला रायगड लोकसभा मतदारसंघातील (Raigad Lok Sabha Constituency) खेड येथे विराट सभा घेतली जाणार असल्याचे अनंत गीते यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य जनतेच्या मनात भाजप व बंडखोर यांनी सुरू केलेल्या राजकारणाबद्दल तीव्र संताप व आक्रोश आहे ते गद्दारांच्या पाठीशी राहिलेले नाही त्यामुळे भाजपही नसतानाबूत होण्याची शक्यता आहे .बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही उलट येणार्या काळात गद्दारांचे हे सरकार भाजपच (bjp) संपवणार असल्याचा दावा अनंत गीते यांनी केला.
यावेळी आपल्या तडफदार शैलीत संजना धाडी यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी शिवसेनेचे खासदार, आमदार, नेते, निष्ठावंत हे भाजपा सरकार पळवू शकत नाही. देशाच्या कानाकोपर्यात बाळासाहेबांचे विचार मांडणारा शिवसैनिक जोपर्यंतजिवंत आहे तोपर्यंत पक्षाच्या अस्तित्वाला कोणीच नष्ट करू शकणार नसल्याचे सरदेसाई म्हणाले.
विजय औटी यांनी तळागाळातील शिवसैनिकांनी एक दिलाने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. शिवसेनेने यापूर्वी अनेक बंड पाहीले आहेत मात्र हे बंड भाजपा पुरस्कृत असल्याचे सांगितले. अभियानाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविकात विलास शिंदे यांनी नाशिक महानगरातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला 40 नगरसेवकांपैकी 33 नगरसेवक आजही एकनिष्ठपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे असल्याचे नमूद केले.जनता दूध खुळी नाही या गद्दारांना पायदळीत तुडवणार व मनपामध्ये उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकवणार असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ताजी गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीजे सूर्यवंशी व देवा जाधव यांनी केले. या बैठकीला उध्दव ठाकरेंवर प्रेम करणारे शिवसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.