सातपूर बस स्थानकाच्या लोकार्पणाला मुहूर्त

सातपूर बस स्थानकाच्या लोकार्पणाला मुहूर्त

सातपूर | प्रतिनिधी | Nashik

सातपूर (satpur) येथील बहू प्रलंबीत बस स्थानकाचे (bus station) काम पूर्ण झाले असून, अखेर त्याच्या लोकार्पणाला 11 फेब्रुवारीचा मुहूर्त सापडलेला असल्याने स्थानकाचे काम गतिमान करण्यात आले आहे.

भाजपाचे (BJP) महाअधिवेशन सातपूरच्या डेमॉक्रॉसी (Democracy) येथे आयोजन करण्यात आले असल्याने त्या वरिष्ठांच्या उपस्थितीत या बस स्थानकाचे लोकार्पण (Inauguration of Bus Station) करण्यात येणार आहे. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले (Former MNS MLA Nitin Bhosale) यांनी शेवटच्या पर्वात बसस्थानकाचे उभारणीचे भूमीपूजन (bhumipujan) केले होते. पूढे भाजपाच्या आमदार सिमा हिरे (MLA Seema Hirey) यांच्या पूढाकाराने या बसस्थानकाचे काम गतीमान करण्यात आले.

सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या खर्चातून हे स्थानक उभे राहीलेले आहे. अनेत तांत्रिक अडथळे पार करुन बसस्थानक अखेर तयार झाले असून, केंद्रीयमंत्री उपमुख्यमंत्री व राजयातील वरिष्ट पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत स्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. या कामांची स्थितीची पहाणी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी प्रत्यक्ष बसस्थानकाला भेट देऊन पहाणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता नितीन वंजारी, विभागीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त डॉ.मयुर पाटील, बांधकाम विभागचे उपअभियंता डि.एस.कोल्हे, सहाय्यक अभियंता राजेंद्र सोनवणे, तानाजी निगळ, युवराज जाधव आदी मान्यवर होते. यावेळी मनपा आयुक्तांनी बस स्थानकात उभारण्यात आलेल्या विविध सेवा सुविधांची प्रत्यक्ष पहाणी केली.त्यात पहिल्या मजल्यावरील विश्राम गृहाची देखिल पहाणी केली.

अधिकार्‍यांनी मार्गदर्शक सुचनाही केल्या.बसस्थापन परिरातील पथदिप, स्वच्छतेबाबत सूचना दिल्या. अशोक नगर भाजी बाजाराचीही पहाणी मनपाच्या माध्यमातून सातपूर कॉलनीतील अशोकनगर भागात भाजी बाजारात असलेले बकालपण घालवण्यासाठी व बाजाराला सूरळीत पणा देण्यासाठी नवा डोम उभारण्यात आला असून त्याठिकाणी प्रसाधन गृहाची बांधणी करण्यात आली आहे. या कामाची पहाणी मनपा आयुक्तांनी केली. लवकरच या मार्केटचेही लोकार्पण केले जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com