पोलीस चौकीचे उदघाटन
नाशिक

पोलीस चौकीचे उदघाटन

Abhay Puntambekar

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

गुन्हेगारी वर वचक बसावे तसेच अत्याधुनिक सुविधा असलेल्या पवननगर येथील पोलीस चौकीचे उदघाटन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत परिसरातील दहा वर्षाच्या कु. सोहम सम्राट भावसार या लहान मुलाच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आ. सीमा हिरे, पोलिस उपायुक्त विजय खरात, पौर्णिमा चौघुले, लक्ष्मण पाटील, अमोल तांबे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, निलेश ठाकरे उपस्थित होते. प्रास्तविक अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांनी केले.

आयुकतालयातील पोलिस चौकी मध्ये सुविधा आवश्यक आहे. त्या प्रमाणेच पवननगर पोलिस चौकीतही अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र खोली तसेच सुविधा करण्यात आले आहे.

आभार गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांनी मानले. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सपोनी संजय बेडवाल, किशोर कोल्हे, गणेश शिंदे, विजय शिंपी, कैलास निंबेकर आदींसह पोलीस अधिकारी, सेवक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com