नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून शहरात शहरी व व ग्रामीण पोलिसांसाठी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे .

१०० बेडच्या या कोविड सेंटरचे आज (१८ सप्टेंबर) रोजी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.

पोलीस व त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्यासाठी रूग्णवाहिका व कोविड उपचारांची सोय या कोविड सेंटरमघ्ये करण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी या कोविड सेंटरला सेवा-सुविधा द्याव्यात, असेही यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्ह्यातील एकूण कोरोना स्थितीबाबतची माहिती विषद केली.

पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आपापल्या कर्यक्षेत्रातील माहिती सादर केली.