जिल्हा रुग्णालयातील १ हजार एलपीएमचा ऑक्सिजन प्लांट सुरु

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती
जिल्हा रुग्णालयातील १ हजार एलपीएमचा ऑक्सिजन प्लांट सुरु

नाशिक | प्रतिनिधी Nashik

साथरोगांच्या काळात व इतर काळातही जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा सतत पुरेसा साठा असावा म्हणून नाशिक जिल्ह्याची वाटचाल ऑक्सिजन स्वयंपूर्णतेच्या दिशेने सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथील एक हजार एलपीएम (one thousand lpm oxygen plant) क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.... (Union health and family welfare minister of state Dr Bharati Pawar)

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात झालेल्या या लोकार्पणप्रसंगी आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, नोडल अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे उपस्थित होते.

यापूर्वी निफाड उपजिल्हा रुग्णालय येथील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

Related Stories

No stories found.