निसर्गोपचार केंद्र नूतन इमारत उद्घाटन

निसर्गोपचार केंद्र नूतन इमारत उद्घाटन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadanavis )व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेझे ( Beze )गावाजवळील निसर्गोपचार केंद्राला सदिच्छा भेट देऊन विवेदा द वेलनेस व्हिलेज या ठिकाणी आ. सीमा हिरे ( MLA Seema Hire )यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या निसर्गोपचार केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले.

त्यानंंंतर सायंंकाळी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांचे पुत्र केतन व चंंद्रकांंत सानप यांंची कन्या शिवानी यांच्या विवाहास सदिच्छा भेट देऊन नवदांम्ंपत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह माजी महापौर सतीश कुलकर्णी, आ. राहुल ढिकले, देवयानी फरांंदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, केदा आहेर व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com