राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ

राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सप्टेंबर 2022 राष्ट्रीय पोषण महिना (National Nutrition Month)म्हणून साजरा करण्यासाठी केंद्र शासनामार्फत सुचवण्यात आलेल्या संकल्पनेद्वारे जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड ( ZP CEO eena Bansod )यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास दिपक चाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते.

राष्ट्रीय पोषण अभियान नाशिक जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून नाशिक जिल्हा कुपोषण मुक्त करावा, अशा सूचना सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या.

राष्ट्रीय पोषण अभियान सन 2021-22 मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी उमराळे, देवळा, सुरगाणा सिन्नर ,येवला या बाल विकास सेवा योजना प्रकल्पांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन लीना बनसोड यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com