
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Schemeअंतर्गत विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यात एकूण 803 कामांचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्ही.सी.) द्वारे मनरेगा अंतर्गत शेत रस्ते, संरक्षक भिंत, बैलगोठा, फळबाग लागवड इ. कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात 803 कामे नव्याने सुरु करण्यात आली असून सदर कामांवर 3.16 (लक्ष) मनुष्य दिवस निर्मिती निर्माण होणार आहे.
सदर विशेष मोहिमेमध्ये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य अधिकारी (ग्रापं) यांचे उपस्थितीत तालुकास्तरावरउपस्थित सरपंच, उपसरपंच, शेतकरी वर्ग, अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत संवाद साधतांना उपस्थितांना सुरु करण्यात आलेल्या कामांबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन तालुकास्तरीय सर्व उपस्थितांचे आभार मानले. जिल्ह्यात अतिशय चांगला उपक्रम सुरु केल्याबद्दल मनरेगाअंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2023-24 या वर्षांचे नियोजन करतांना आदिवासी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कामे शेल्फवर घेण्यात येऊन आदिवासी तालुक्यामध्ये होणारे स्थलांतराचे प्रमाण रोखण्यास मोठया हातभार लागणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे हाती घेणेकामी मार्गदर्शन केले.
सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्ह्यास 18 लक्ष मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले असून माहे नोव्हेंबर 2022 अखेर 110 टक्के साध्य करण्यात आले असून मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त कामे हाती घेवून जिल्ह्यात मनुष्य दिवस निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात वाढ करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालकमंत्री यांना आश्वासन दिले व आदिवासी तालुक्यातील स्थलांतरण होणार नाही, यानुसार आदिवासी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे शेल्फवर घेणेकामी नियोजन करण्यात येईल.