धनंजय मुंडे म्हणतात, भविष्यात मागासवर्ग विकास महामंडळ नाही तर...

धनंजय मुंडे म्हणतात, भविष्यात मागासवर्ग विकास महामंडळ नाही तर...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महामंडळाच्या व महाप्रीत (Mahaprit) कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना ग्रामीण भागात उद्योग, स्वयंरोजगार यांना चालना मिळावी, अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, तसेच यासाठी केंद्र व राज्य सरकारने (Central and State Government) सुरू केलेल्या विविध योजनांचा (scheme) लाभ गरजू घटकांना मिळावा यासाठी सबंधित सर्व अधिकाऱ्यांनी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहायक मंत्री धंनजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले आहे.

नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथे आयोजित महात्मा फुले नविकरणीय उर्जा प्राद्योगिकी मर्या (महाप्रित) मुंबई आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे (State level workshop) उद्घाटन (Inauguration) ऑनलाईन पध्दतीने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहायक मंत्री धंनजय मुंडे यांचे हस्ते करण्यात आले.

महामंडळाच्या जुन्या योजनांसोबतच आता विविध कृषी प्रक्रिया उद्योग राबविण्यासंदर्भात नाविन्यपूर्ण योजना राबविली जात आहे. महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन भाजीपाला, फळे आदी प्रक्रिया व विक्री साठी 100 महिला बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. बायोगॅस, फ्लाय ऍशपासून विस्तारित होणारे प्रकल्प यांनाही आर्थिक प्रोत्साहन मिळाल्यास या क्षेत्रातही रोजगारासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

आज सर्व जगाला सौर ऊर्जेचे महत्व कळले आहे. मर्यादित ऊर्जा स्रोतांच्या काळात सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन दिल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार तर मिळतीलच शिवाय शासनाला देखील ऊर्जा नियमनासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

भविष्यात मागासवर्ग विकास महामंडळ नाही तर आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे महामंडळ म्हणून ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण सर्वांनी मिळून व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे देखील मुंडे यांनी सांगितले.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. अंतर्गत एप्रिल-2021 मध्ये ‘महाप्रित’ कपंनी स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थींना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजना प्रस्तावित आहेत. त्यानंषगाने महात्मा फुले नविकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) मार्फत मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी हवामान बदलाचा विचार करुन कृषी प्रक्रिया उद्योग, सौर प्रकल्प, मुलभूत सुविधा असे पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

- बिपीन श्रीमाळी, व्यवस्थापकीय संचालक.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने सर्व योजनांचे उद्दीष्टे पूर्ण करण्याबरोबरचं जास्तीत जास्त योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहचतील यासाठी प्रयत्न करावे,जेणेकरुन मागासवर्गीय समाजाला योजनांची माहिती होवून त्याचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील व त्यांची आर्थिक उन्नती होईल.

- राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त

Related Stories

No stories found.