डॉ. पवारांच्या हस्ते जलजीवन मिशनचे उद्घाटन

डॉ. पवारांच्या हस्ते जलजीवन मिशनचे उद्घाटन

ठाणगाव । वार्ताहर | Thangaon

देशभरातील विशेषत: ग्रामिण भागातील (rural area) महिला ह्या पिण्याचे पाणी (drinking water) डोक्यावर हंडे ठेऊन आणत असल्याने याची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जलशक्ती मंत्रालय (Ministry of Jalshakti) निर्माण करून ‘हर घर जल हर घर नल’ ही योजना देशात राबवली जात आहे.

यामुळे पाण्याचा प्रश्न (water issue) मार्गी लागणार असल्याचे सांगून केंद्र सरकारच्या (central government) गाव पाड्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी केले. सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) हस्ते, आंबोडे, 28 गावातील मंजूर केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन (Bhumipujan of development works) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार (Ministry of Jalshakti New Delhi Government of India) आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन (Water Supply and Sanitation Department, Government of Maharashtra) यांच्या संयुक्त पुरस्कृत जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या कामांचे भुमीपुजन नामदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्थानिक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, या योजनेच्या माध्यमातून हा महत्त्वाचा पाणीप्रश्न प्रथम सोडवायचा आहे. या योजनेद्वारे विहीर (well), पाण्याची टाकी (water tank), पाइपलाईन (Pipeline), नळ दिले जाणार असून सुरगाणा तालुक्यातील 28 गाव व पाड्यांसाठी एकुण 26 कोटी 18 लाख रुपयांचा निधी (fund) मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

उज्वला गॅस योजना (Ujwala gas scheme) राबवून महिलांची गैरसोय दूर केली आहे. या भागात वनौषधी असल्याने वनधन केंद्राच्या माध्यमातून एक गट तयार करण्यास सांगितले. आंबोडे व खोकरविहिर या गावाजवळ असलेल्या प्रसिद्ध भिवतास धबधबा या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक (Tourist) येत असल्याने पर्यटन विकास होण्यासाठी निधी मंजूर केला आहे. लक्ष ठेवण्यासाठी टॉवर, दरीलगत संरक्षक कठडे बसवले जात असून एक कमिटी स्थापन केली जाणार असून या कमिटीने देखभाल करायची आहे.

येथे येणार्‍या पर्यटकांना महिला बचत गटाच्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करून पवार यांनी पाणी टंचाई व्यतिरिक्त रस्ते, आरोग्य, गरोदर माता इत्यादी बाबींचा आढावा घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, काही अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क साधावा तसेच महिला बचत गटांसाठी जी मदत करता येईल ती करेल याचे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी विकास मीना, तहसिलदार सचिन मुळीक, माजी सभापती मनिषा महाले,

मा.सरपंच अनुसया भोये, भाजपचे पदाधिकारी एन. डी. गावित, तालुकाध्यक्ष रमेश थोरात, महिला विकास आघाडी तालुकाध्यक्ष मिनाक्षी कुंवर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले, विजय कानडे, रंजना लहरे, जानकीबाई देशमुख, जि.प.सदस्य गोपाळ धूम, माजी सरपंच सुनिल भोये, रुपेश शिरोडे, राजेंद्र निकुळे, गोरख महाले, मनोहर जाधव, आवजी पालवी, माजी सरपंच योगीराज पवार, जयप्रकाश महाले, केशव पालवी, जयवंत बागुल, राजेंद्र बागुल, वसंत घांगळे, उत्तम कडू आदींसह अधिकारी तसेच बार्‍हे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खोकरविहिर, खडकी (दि.), हट्टी बुद्रुक, वाळुठझिरा, करंजुल (क.), माणी, मांधा, उंबरठाण, खिरमाणी, सायळपाडा, मोधळपाडा, श्रीरामपूर, करंजाळी, भदर, बोरचोंड, म्हैसखडक, श्रीभुवन, रगतविहिर, बर्डीपाडा, उदमाळ, चिंचले, पिंपळसोंड, मांगधे, हस्ते, कोठुळा, मास्तेमाणी, आंबोडे, सुंदरबन सोनगीर या गावात हर घर जल हर घर नल या करिता एकूण 26 कोटी 18 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

गावांतील आरोग्य तसेच पाणी प्रश्नाबाबत समस्या जाणून घेत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. वनबंधू योजनेतून सिमेंट कॉक्रिटचे बंधारे - चुली, भदर, हडकाईचोंड, सांबरपाडा, श्रीभुवन बर्डा, म्हैसखडक, बोरपाडा - 1 कोटी 75 लाख रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. गॅबियन बंधारे - 40 लाख. जिल्हापरिषद शाळांसाठी 1 कोटी 40 लाख. पळसन येथे आश्रमशाळेसाठी जॉगींग ट्रॅक - 46 लाख. आंबूपाडा व पळसन आश्रमशाळा करिता वर्कशॉप बांधकामासाठी - प्रत्येकी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हतगड येथे थीम रेस्टॉरंट - 30 लाख रुपये मंजूर झाले तर भिवतास धबधबा - 46 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com