विद्यापीठाचे जेनेटिक लॅबचे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन

विद्यापीठाचे जेनेटिक लॅबचे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

समाजासाठी आरोग्य शिक्षण (Health education), संशोधन आणि रोग निदान (Research and diagnosis) त्रिसूत्री महत्वाची असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी (Governor Shri. Bhagat Singh Koshyari) यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे (Maharashtra University of Health Sciences) पुणे (pune) येथील डॉ. घारपुरे मेमोरिअल जेनेटिक लॅब व कॅन्सर रिसर्च सेंटरचे (Dr. Gharpure Memorial Genetic Lab and Cancer Research Centre) उद्घाटन, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (National AIDS Research Institute and National Center for Cell Science) यांच्या समवेत परस्पर सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. व ‘मानस’ अ‍ॅपचा प्रारंभ विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर होत्या. भारतीय औषध संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास जोशी उपस्थित होते. विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. फडके यांनी ऑडियो संदेशाव्दारे जेनेटिक लॅबचे (Genetic Lab) उद्घाटन व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाचे संशोधन हे समाजोपयोगी ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरीता (students) मानसिक आरोग्याबद्दल जागरुकता (Mental health awareness) निर्माण करण्याच्या दृष्टीने ’मानस’ अ‍ॅपचा (Manas App) शुभारंभ मा. राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आला आहे. व नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्या समवेत सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले. सामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक मानसिक आरोग्याबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ’मानस’ अ‍ॅप विकसीत करण्यात आले आहे.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आरोग्य विषयक जनजागृती (Health awareness) करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. यासाठी ’मानस’ अ‍ॅपची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे अशी माहिती केंद्र शासनाच्या (central government) प्रिंसिपल सायंन्टीफिक अ‍ॅडव्हायझर कार्यालयाच्या संशोधिका डॉ. केतकी बापट यांनी दिली. आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी मानले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, भारतीय औषध संशोधन संस्थेचे पदाधिकारी अक्कलकोटकर, डॉ. जेठाळे, डॉ. शेंडे, डॉ. काळे, डॉ. घनःशाम मर्दा, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. सुरेश पाटणकर, कॅन्सर जेनेटिक रिसर्चच्या चेअर प्रोफेसर डॉ. अनुराधा चौगुले, श्रीमती एकबोटे, डॉ. वाणी, डॉ. कल्पना श्रीवास्तव, डॉ. शिला गोडबोले, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही.कळसकर, ब्रिग. डॉ. सुबोध मुळगुंद, अ‍ॅड. संदीप कुलकर्णी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com