बंदिजनांच्या वस्तुंना सणोत्सवात व्यासपीठ : भुजबळ

मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन
बंदिजनांच्या वस्तुंना सणोत्सवात व्यासपीठ : भुजबळ

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik

मध्यवर्ती कारागृहातील (central prison) बंदीवानांनी आपली कला व सृजनशीलतेच्या (Art and creativity) माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तू सर्वसामान्यांकरीता उपलब्ध होण्यासाठी नाशिक मध्यवर्ती करागृहाअंतर्गत (Nashik Central Jail) प्रगती विक्री केंद्र (pragati sales center) सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रात बंदिवानांनी (Prisoners) तयार केलेल्या वस्तूंना सणोत्सवांच्या (festivals) निमित्ताने व्यासपीठ मिळाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री (Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (District Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले. नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या प्रगती विक्री केंद्रात दिवाळी (diwali) मेळाव्यानिमित्त बंदिवानांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राच्या (Exhibition and sale center of goods) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, सीआयएसएफचे कमांडंट के.के. भारद्वाज, पोलिस उपायुक्त विजय खरात, उप पोलिस अधीक्षक श्यामकुमार निपुंगे, जिजाऊ बिग्रेड महिला अत्याचार समितीच्या अध्यक्ष चारूशिला देशमुख यांच्यासह कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, 1927 साली या कारागृहाची निर्मिती झाली असल्याने अनेक नामवंत स्वातंत्र्य योद्धे तसेच साने गुरूजी हे या कारागृहात वास्तव्यास असल्याने या कारागृहास ऐतिहासिक ओळख आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com