क्रेडाई वास्तू एक्स्पोचे उद्घाटन

क्रेडाई वास्तू एक्स्पोचे उद्घाटन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

कसमादेना भागातील नागरीकांचे नवीन घरांचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीकोनातून क्रेडाई (CREDAI) मालेगावतर्फे (malegaon) घर खरेदीचे अनेक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून 28 एप्रिल ते 1 मे या दरम्यान वास्तू एक्स्पो प्रदर्शनाचे (Vastu Expo Exhibition) आयोजन करण्यात आले आहे.

गृह प्रकल्पांबरोबर बांधकाम व्यवसायाशी संबंधित नामांकित ब्रॅण्डस्, बिल्डींग मटेरियल, गृह कर्ज देणार्‍या बँका, सिक्युरिटी सिस्टीम आदींची माहिती या प्रदर्शनात चार दिवस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाचा कसमादेना वासियांनी लाभ घेत आपल्या नवीन घराचे स्वप्न साकारावे, अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष रविंद्र शेलार (CREDAI President Ravindra Shelar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील सटाणारोडवरील यशश्री कंपाऊंड येथे 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान आयोजित कालिका स्टिल क्रेडाई वास्तू एक्स्पोचा भुमीपूजन (Bhumi Pujan of Steel Credai Vastu Expo) सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

क्रेडाईचे अध्यक्ष रविंद्र शेलार व त्यांच्या पत्नी दीपाली शेलार यांच्या हस्ते भुमीपूजन (bhumipujan) संपन्न झाले. यावेळी क्रेडाईचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार दिवस आयोजित या एक्स्पोची यशश्री कंपाऊंड प्रांगणात जय्यत तयारी केली जात आहे. यासाठी भव्य डोमची निर्मिती अंतीम टप्प्यात असून बांधकाम क्षेत्रातील (construction sector) मान्यवर संस्थांचे 85 स्टॉल्स् (Stalls) या ठिकाणी उभारले जात आहे. शहरात बांधकाम क्षेत्राशी संबंधित भव्य प्रदर्शन क्रेडाईतर्फे आयोजित केले जात असल्याने नागरीकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

घर खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांना विक्रेत्याशी प्रत्यक्ष संवाद साधता येणार आहे. या प्रदर्शनाबरोबरच नॉलेज सेमीनार, सेवाभावी व्यक्तींचा सन्मान, खाद्य जत्रा व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रविंद्र शेलार यांनी पुढे बोलतांना दिली. क्रेडाई वास्तू एक्स्पोचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते केले जाणार आहे. या प्रदर्शनाबरोबरच शहरातील प्रगतीचे चित्र येथे भेट देणार्‍या नागरीकांच्या लक्षात यावे हा हेतू सुध्दा ठेवण्यात आलेला आहे.

औद्योगिक वसाहतीत नवनवीन उद्योग व प्रकल्प यावेत या दृष्टीकोनातून प्रयत्न प्रदर्शनाच्या माध्यमातून केले जाणार असून नवीन घराचे स्वप्न सुलभतेने साकार व्हावे तसेच बांधकाम क्षेत्रातील नवनवीन संकल्पनांची व तंत्रज्ञानाची माहिती शहरवासियांना मिळावी हा दृष्टीकोन देखील प्रदर्शन आयोजनातून ठेवण्यात आला असल्याची माहिती शेलार यांनी दिली. यावेळी क्रेडाईचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भामरे, राज्य क्रेडाई सदस्य दीपक मोदी यांच्यासह विवेक देवरे, अनिल भाला, विजय सोनवणे, सचिन शाह, भगिरथ आसदेव आदींसह पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.