corona test
corona test
नाशिक

करोना टेस्टिंग लॅबचे आज लोकार्पण

खासदार गोडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारले टेस्टिंग लॅब

Abhay Puntambekar

देवळाली कँप । वार्ताहर Devlali Camp

खासदार हेमंत गोडसे यांच्या एक कोटी रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून उभारलेल्या करोना टेस्टिंग लॅबचा आज शुक्रवार दि.7 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री नामदार छगनराव भुजबळ यांच्या हस्ते आणि कृषिमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.

करोनाचा प्रार्दूभाव वाढणार असल्याची जाणीव होताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी प्रत्येक जिल्हयात करोना टेस्टिंग लॅब असावी, असे निर्देश दिले होते. त्यानंतरच लगेचच खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. तीन महिन्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर चार दिवसांपूर्वी लॅबची उभारणी पूर्ण झालेली आहे.

लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक असणार्‍या परवानगी दोन दिवसांपूर्वी मिळालेल्या आहेत. लॅब सुरु होणार असल्याने यापुढे नाशिक जिल्हातील रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी धुळे, पुणे येथे पाठविण्याची गरज पडणार नसून अवघ्या दोन तासात स्वॅब तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयातील टेस्टिंग लॅबमध्येच मिळणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

लोकार्पण सोहळ्यास खासदार डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. भारती पवार, आ. सुधीर तांबे, आ. माणिकराव कोकाटे, आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार, आ. दिलीप बनकर, आ. डॉ. राहूल आहेर, आ. नरेंद्र दराडे, आ. सीमा हिरे, आ. सरोज आहिरे, आ. दिलीप बोरसे, आ. देवयांनी फरांदे, आ. सुहास कांदे, आ. ड. राहूल ढिकले, आ. किशोरभाऊ दराडे, महापौर सतिष कुलकर्णी,

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर वरील मान्यवरांसह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित राहणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com