मविप्रकडून समाजाला शिक्षित करण्याचे कार्य

मविप्रकडून समाजाला शिक्षित करण्याचे कार्य

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मविप्र संस्थेच्या (MVP) कर्मवीरांनी गुलामगिरी, अडाणीपणा व अंधश्रद्धेतून समाजाची सोडवण केली. परिपूर्ण माणूस घडविण्यासाठी प्रयत्न केले. आजच्या घडीला आरोग्याच्या महामारीसोबतच विचारांच्या महामारीवर मात करणे गरजेचे आहे...

आपण शेवटच्या श्वासापर्यंत मविप्र संस्थेला मदत करणार, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर सोनवणे (yashomati thakur) यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) संचलित सीएमसीएस महाविद्यालय (CMCS College) विस्तारित इमारत उद्घाटन व कर्म. ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील मुलींचे वसतिगृह नवीन इमारत उद्घघाटन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Dr. tushar Shewale) होते. प्रमुख अतिथी आ. सुधीर तांबे (Sudhir Tambe), हिरामण खोसकर (Hiraman Khoskar), माजी मंत्री शोभा बच्छाव, नगरसेविका वत्सला खैरे, स्वाती भामरे, ॲड.पंडितराव पिंगळे, ॲड.शशिकांत पवार, डॉ. कैलास कमोद,

संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नानासाहेब महाले, भाऊसाहेब खताळे, डॉ. विश्राम निकम, डॉ. प्रशांत देवरे, दत्तात्रय पाटील, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, अशोक पवार, डॉ. प्रशांत पाटील, सेवक संचालक प्रा. नानासाहेब दाते, नंदा सोनवणे, संदीप गुळवे, दीपक बोरस्ते, शिक्षणाधिकारी डॉ. एस. जे. कोकाटे, डॉ. डी. डी. काजळे, सी. डी. शिंदे, डॉ. एस. के. शिंदे, डॉ. अजित मोरे आदी उपस्थित होते.

ठाकूर पुढे म्हणाल्या की, देशातील विचार हरवत चालला आहे. चांगले विचार आणि माणूस घडविण्यासाठी महात्मा गांधी (Mahatma Gandhi), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) व गाडगेबाबा (sant gadge baba) यांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगून मविप्र संस्था ‘अंतरी असावा पंढरी’ या उक्तीप्रमाणे समाजाला शिक्षित करण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार (Nilimatai Pawar) यांनी संस्थेच्या कर्मवीरांनी १०७ वर्षांपूर्वी दारिद्र्य, भय, लाचारी आदींविरुद्ध लढा देऊन समाजाला शिक्षित केले. आज नाशिक जिल्ह्याला (Nashik District) साक्षर करण्यात मविप्रचा वाटा ५० टक्के इतका असून शिक्षण सर्वदूर गेलेले असले तरी माणूस घडवायला आपण विसरलो.

त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मुल्य रुजविण्याची आवश्यकता आहे. तसेच देशाला सर्वच क्षेत्रात उत्तमोत्तम नेतृत्व देण्यासाठी काम करण्याची गरज आहे. लोकसहभाग हा कायम संस्थेचा कायम पाया राहिलेला आहे. संस्थेच्या कर्मवीरांनी माणसातला देव शोधला तसेच पदरमोड करून संसाराच्या आहुती संस्थेसाठी वाहिल्याचे सांगून समाजाप्रती सेवा देणे हे संस्थेचे कर्तव्य असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मविप्र संस्था ही शिस्तबद्धपणे कामकाज करीत असून बहुजन हिताय,बहुजय सुखाय हे ब्रीद समोर ठेऊन मार्गक्रमण करीत आहे. संस्थेला कायम राजाश्रयाची गरज असून यशोमती ठाकूर या मविप्र परिवाराच्या सभासद झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. सूत्रसंचालन अर्चना गाजरे यांनी तर आभार चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com